जमीन नावावर करण्याच्या नावाखाली पाच लाख ८० हजारांची फसवणूक; गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 02:30 AM2017-09-07T02:30:53+5:302017-09-07T02:31:01+5:30
जमीन नावावर करण्याच्या नावाखाली पाच लाख ८० हजारांची फसवणूक करणाºया येसाप्पा शिंदे याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ठाणे : जमीन नावावर करण्याच्या नावाखाली पाच लाख ८० हजारांची फसवणूक करणाºया येसाप्पा शिंदे याच्याविरुद्ध कोपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी कोणालाही अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.
सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथे राहणाºया येसाप्पा शिंदे याने २०१० ते २०१७ या सात वर्षांच्या कालावधीत कोपरीतील ठाणेकरवाडी येथील एका ज्येष्ठ नागरिकाला सोलापूरच्या प्रतापनगर येथे शेतजमीन स्वस्तात विक्रीसाठी असल्याचे सांगितले. त्याच नावाखाली त्यातील अर्धी शेतजमीन मी तुझा मुलगा सचिन याच्या नावावर करून देतो, असे सांगून या ६१ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाकडून आणि त्यांच्या मुलाकडून पाच लाख ८० हजार रुपये घेतले. त्यातूनच त्याने स्वत:च्या नावावर काही शेतजमीन खरेदी केली. त्याची माहितीही लपवून ठेवली.
ती त्यांच्या मुलाच्या नावावर न करता तिची परस्पर २६ लाखांना विक्री करून तिचा अपहार केला. आपली यात फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी याप्रकरणी कोपरी पोलीस ठाण्यात ४ सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक आर.एस. गोपाळ हे अधिक तपास करीत आहेत.