लढत २०१५ : सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला; युतीचा विचका?

By admin | Published: October 14, 2015 02:34 AM2015-10-14T02:34:06+5:302015-10-14T02:34:06+5:30

केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता असलीतरी पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर जागावाटपावरून युतीचा विचका झाला आहे. १९९५, २००० प्रमाणे यंदाही

Fight 2015: Achieving the reputation of all; Alliance of the Alliance? | लढत २०१५ : सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला; युतीचा विचका?

लढत २०१५ : सर्वांचीच प्रतिष्ठा पणाला; युतीचा विचका?

Next

प्रशांत माने, कल्याण
केंद्रात आणि राज्यात युतीची सत्ता असलीतरी पुन्हा एकदा स्थानिक पातळीवर जागावाटपावरून युतीचा विचका झाला आहे. १९९५, २००० प्रमाणे यंदाही (२०१५) शिवसेना-भाजपाच्या उमेदवारांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्याने युती तुटल्याची चर्चा आहे. परंतु, याची औपचारीक घोषणा अद्यापपर्यंत झालेली नाही. दुसरीकडे झालेली आघाडी काँग्रेस - राष्ट्रवादीला तारेल का? तर लाट ओसरलेल्या मनसेचा करिष्मा यंदा चालेल का? हे देखील या निवडणुकीत पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
२००२ मध्ये वगळलेल्या २७ गावांचा या निवडणुकीपूर्वी पुन्हा केडीएमसीत समावेश झाला आहे. नव्या प्रभाग रचनेत प्रभागांची संख्या १०७ वरून १२२ वर पोहोचली आहे. नव्या १५ प्रभागांची वाढ झाली आहे.
122जागांमध्ये बहुमतासाठी ६१ हून अधिक जागा मिळविणे आवश्यक असल्याने सर्वच पक्षांचा ‘कस’ लागणार आहे. भाजपला मागील २०१० च्या निवडणुकीत केवळ
९ जागा मिळाल्या आहेत.
दरम्यानच्या काळात या नऊ पैकी दोन नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला
आहे. भाजपच्या गळाला राष्ट्रवादीचे काही नगरसेवक लागले असलेतरी यंदाच्या निवडणुकीत त्यांच्यापुढे ‘जागा वाढविणे’ हे मोठे आव्हान असणार आहे.
लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील मोदी लाटेत भाजपाला भरभरून मते मिळाली आहेत. याचा फायदा महापालिकेच्या निवडणुकीत होतो का? याकडेही सर्वांचे लक्ष लागले आहे. केंद्रात आणि राज्यातील सत्ता गमावलेले काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे पक्ष या निवडणुकीत आघाडी करून लढत आहेत. याचा फायदा या दोघांना किती होईल? हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होईल. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत मनसेचा दारूण पराभव झाला आहे. यात मनसेची लाट ओसरल्याचे चित्र असताना राज ठाकरे नावाचा करिष्मा यंदा कितपत चालेल? हा देखील संशोधनाचा विषय आहे.

Web Title: Fight 2015: Achieving the reputation of all; Alliance of the Alliance?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.