VIDEO: बदलापूरच्या लसीकरण केंद्रात तुफान राडा; शिवसेना-भाजपाचे पदाधिकारी एकमेकांना भिडले
By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2021 08:27 PM2021-07-07T20:27:55+5:302021-07-07T20:33:05+5:30
हाणामारीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
अंबरनाथ : बदलापुरात कोरोना लसीकरण केंद्रावरच शिवसेना आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. आज दुपारी बदलापूर पालिकेच्या दुबे रुग्णालयात हा प्रकार घडला. हाणामारीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बदलापूरच्या लसीकरण केंद्रात शिवसेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी; घटना सीसीटीव्हीत कैद https://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/mxra7CCIec
— Lokmat (@MiLOKMAT) July 7, 2021
कोरोना लसीकरण केंद्रांवर राजकीय कार्यकर्ते वशिलेबाजी करत असल्याच्या तक्रारी बदलापुरात अनेकदा समोर आल्या होत्या. राजकीय पुढारी आणि नगरसेवक हे आपल्या प्रभागातील नागरिकांना लसीकरण केंद्रावर वशिल्याने आत मध्ये प्रवेश देत होते. त्याच वादातून आज शिवसेनेचे पदाधिकारी आणि भाजपाचे पदाधिकारी एकमेकांवर धावून गेले. एकीकडे लसीकरण सुरू असताना दुसरीकडे शिवसेना आणि भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मध्ये हाणामारी सुरू झाली होती ही आणा मारी सोडण्यासाठी काही नागरिकांनी सुरक्षारक्षक देखील पुढे सरसावले, मात्र त्यांना आवरणं सुरक्षारक्षकांना देखील अवघड गेले. अक्षरशः खाली पाडून लाथाबुक्यांनी एकमेकांना तुवण्यात आले. याचवेळी एका गटाच्या कार्यकर्त्याने दुसऱ्या गटाच्या कार्यकर्त्याच्या डोक्यात थेट बेंच टाकला. या सगळ्यामुळे लसीकरण केंद्रावर काही काळ मोठा गदारोळ निर्माण झाला. हाणामारीचा हा सगळा प्रकार लसीकरण केंद्रावरील सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला. अशा राडेबाज कार्यकर्त्यांमुळे राजकीय पक्षांची प्रतिमा मात्र मलीन झाली आहे. दरम्यान या प्रकाराबाबत बदलापूर पूर्ण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.