क्षुल्लक कारणावरून झाली हाणामारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:42 AM2021-03-17T04:42:16+5:302021-03-17T04:42:16+5:30
मुरबाड : मुरबाड तालुक्यात गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहिलेला नाही हे साखरे (धारगाव) येथील घडलेल्या घटनेवरून दिसून येते. धारगाव येथे ...
मुरबाड : मुरबाड तालुक्यात गुन्हेगारांवर कायद्याचा वचक राहिलेला नाही हे साखरे (धारगाव) येथील घडलेल्या घटनेवरून दिसून येते. धारगाव येथे क्षुल्लक कारणावरून हाणामारी होऊन यात सहा जण जखमी झाले.
जखमींमध्ये नितीन उगवणे, भरत उगवणे, बाळकृष्ण उगवणे व इतर तिघांचा समावेश आहे. टोकावडे पोलिसांनी ग्रामीण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. परंतु रक्तस्राव व गंभीर जखमी असल्याने त्यांना उपजिल्हा रुग्णालय, उल्हासनगर येथे दाखल केले होते. मात्र तेथे दोन दिवस तेथे उपचार केल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आले. परंतु पुन्हा त्यांच्या प्रकृतीत बिघाड झाल्याने उपजिल्हा रुग्णालय मुरबाड येथे त्यांना दाखल केले आहे. पोलिसांनी परस्परांवर गुन्हे दाखल केले आहेत. याबाबत टोकावडे पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सुहास खरमाटे यांच्या म्हणण्यानुसार डाॅक्टरांच्या अहवालानुसार गुन्हा दाखल केला आहे.