उल्हासनगरात शिंदे गटात राडा; वसंत भोईर अन् विजय जोशीचा एकमेकांवर आरोप

By सदानंद नाईक | Published: December 12, 2022 06:59 PM2022-12-12T18:59:11+5:302022-12-12T19:00:12+5:30

शिवसेना शिंदे गटाचे विजय जोशी समर्थकासह नाल्याची पाहणी करीत असतांना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका विमल भोईर यांचे पती वसंत भोईर हे समर्थकासह तेथे आले.

Fighting in Shinde group in Ulhasnagar; Vasant Bhoir and Vijay Joshi accuse each other | उल्हासनगरात शिंदे गटात राडा; वसंत भोईर अन् विजय जोशीचा एकमेकांवर आरोप

उल्हासनगरात शिंदे गटात राडा; वसंत भोईर अन् विजय जोशीचा एकमेकांवर आरोप

Next

उल्हासनगर : कॅम्प नं-४ येथील व्हीनस चौक ते श्रीराम चौक रस्ता पुनर्बांधणी पूर्वी नाल्याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या शिवसेना शिंदे गटातील पदाधिकारी विजय जोशी व माजी नगरसेवक विमल जोशी यांचे पती वसंत भोईर यांच्या समर्थकात सोमवारी दुपारी हाणामारी झाली. याप्रकारने मोर्यानगरी रस्ता वादात सापडून विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

उल्हासनगर महापालिकेने रिंग रोड म्हणून विकसित केलेला मोर्यानगरीचा रस्ता कल्याण-डोंबिवली व उल्हासनगर महापालिका दरम्यान येतो. त्यामुळे गेले अनेक वर्षे रस्त्याच्या पुनर्बांधणीचे काम रखडले होते. उल्हासनगर महापालिका मात्र पावसाळ्यापूर्वी रस्त्याची दुरुस्ती करते. खासदार श्रीकांत शिंदे व स्थानिक आमदार गणपत गायकवाड यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे एमएमआरडीए अंतर्गत १७ कोटीच्या निधीतून रस्ता पुनर्बांधणीला मंजुरी मिळाली. तसेच रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. सोमवारी दुपारी १ वाजण्याच्या दरम्यान कॅम्प नं-४ एसएसटी महाविद्यालया समोरील नाल्याच्या रुंदीकरणाची पाहणी करण्यासाठी आशेळे गावचे शिवसेना पदाधिकारी विजय जोशी समर्थकासह आले होते. 

शिवसेना शिंदे गटाचे विजय जोशी समर्थकासह नाल्याची पाहणी करीत असतांना शिंदे गटाच्या माजी नगरसेविका विमल भोईर यांचे पती वसंत भोईर हे समर्थकासह तेथे आले. यावेळी त्यांच्या तू तू मैं मैं होऊन त्यांच्या हाणामारी झाली. यामध्ये ३ पेक्षा जास्त जण जखमी झाले असून त्यांच्यावर मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहे. विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय गायकवाड यांनी परिसरातील तणावाचे वातावरण कमी करण्याचा प्रयत्न केला.

सहायक आयुक्त मोतीचंद राठोड यांनीही घटनेचा आढावा घेतला. दोन्ही गटातील आपसी वादातून हाणामारी झाली असून तक्रारीवरून परस्परा विरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती सहायक आयुक राठोड यांनी दिली. या हाणामारीने शिंदे गटातील वाद उफाळून आला असून पक्षाकडून दोन्ही गटाला समज देणार असल्याची माहिती पक्षाच्या वरिष्ठांनी दिली. विट्ठलवाडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून अधिक तपास विठ्ठलवाडी पोलीस करीत आहेत.

Web Title: Fighting in Shinde group in Ulhasnagar; Vasant Bhoir and Vijay Joshi accuse each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.