धावत्या लोकलमधून तरुणाला फेकणाऱ्याचे अखेर रेखाटले रेखाचित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2018 07:16 PM2018-10-25T19:16:36+5:302018-10-25T19:42:29+5:30

ठाणे : लोकलमधून तरुणाला फेकल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तातडीने आरोपीचा कसून तपास सुरू केला आहे.  ...

Figure out the drawing of the youngster from the running local | धावत्या लोकलमधून तरुणाला फेकणाऱ्याचे अखेर रेखाटले रेखाचित्र

धावत्या लोकलमधून तरुणाला फेकणाऱ्याचे अखेर रेखाटले रेखाचित्र

Next
ठळक मुद्देफिर्यादी आणि साक्षीदारांची घेतली मदतआरोपीचा कसून तपास सुरू

ठाणे : लोकलमधून तरुणाला फेकल्याच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे लोहमार्ग पोलिसांनी तातडीने आरोपीचा कसून तपास सुरू केला आहे.  अखेर गुरुवारी त्या आरोपीचे रेखाचित्र रेखाटून जारी केल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
मुंब्य्रातील जासीर शेख (१९) हा तरुण मंगळवारी रात्री १०.२८ च्या धीम्या बदलापूर लोकलने ठाण्यातून मुंब्य्रात जाण्यासाठी मालडब्ब्यात चढताना त्याचा धक्का आरोपीला लागला. त्यातून त्यांच्या बाचाबाची होऊन वाद झाला. तो आतील सहप्रवाशांनी सोडवला. कळवा रेल्वे स्थानकातून लोकल सुटल्यावर जासीर हा डब्ब्याच्या दारवाज्यातच उभा होता. त्यावेळी आरोपीचा पाय त्याच्या पायाला लागत असल्याने त्याने सांगितले. त्यातून त्या दोघांमध्ये पुन्हा बाचाबाची होऊन भांडण झाले. याचदरम्यान आरोपीने जासीर याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने लाथ मारून लोकलमधून खाली पाडले. ही घटना कळवा-खारेगाव फाटकाजवळ घडली. त्यामध्ये जासीरच्या डोक्याला आणि पायाला दुखापत झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली  गुरुवारी पोलिसांनी आरोपीला पाहिलेल्या जासीर आणि अन्य साक्षीदारांना पोलीस ठाण्यात बोलावून त्यांनी केलेल्या वर्णनावरून रेखाचित्रकाराने आरोपीचे रेखाचित्र रेखाटल्याची माहिती पोलिसांनी दिली. आता, त्याच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

 

Web Title: Figure out the drawing of the youngster from the running local

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.