रामदेव बाबांवर 354 ड या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करा- राष्ट्रवादीचे माजी खासदार आनंद परांजपे यांची मागणी
By अजित मांडके | Published: November 26, 2022 01:27 PM2022-11-26T13:27:04+5:302022-11-26T13:27:14+5:30
ठाणे : राजापालांनी आधी विधान केलं त्यानंतर आता रामदेव बाबांनी अशा प्रकारे स्त्रीच्या अपमानास्पद विधान केले आहेत. या अशा ...
ठाणे :
राजापालांनी आधी विधान केलं त्यानंतर आता रामदेव बाबांनी अशा प्रकारे स्त्रीच्या अपमानास्पद विधान केले आहेत. या अशा विधानावरून महाराष्ट्राच्या अस्मिता वरती आघात करण्याचे वारंवार प्रकार सुरू आहे. याचा राष्ट्रवादी काँग्रेसने तीव्र शब्दात निषेध करत.
रामदेव बाबांवर ३५४ ड या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्याची कारवाई राज्याचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी करावी अशी मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी खासदार तथा जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी केली. तसेच आमच्यावर दुसरे कुठे गुन्हा दाखल करतात, तसे आता हिम्मत दाखवून खरे गुन्हे दाखल करावे. असे त्यांनी म्हटले.
एकीकडे आपण स्त्रीला आदिशक्ती व देवीच्या भूमिकेत मानतो. महाराजांपासून आपण स्त्रीला मोठा स्थान देत आलो. शुक्रवारी ठाण्यात रामदेव बाबांनी विधान केले, ते स्त्री जातीचा अपमान आहे. तेही गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या समोर केले. हे विधान बाबा रामदेव त्यांच्या विकृत मनोवृत्तीचा प्रदर्शन करणारे आहे. फक्त भगवे वस्त्र घातले योगा केल्यामुळे मानसिक स्वास्थ सुधारू शकते, पण मानसिक दृष्ठ्या बाबारामदेव विकृत आणि मनोरुग्ण आहेत. हे त्यांच्या विधानातून स्पष्ट झाले. ठाण्याचे पोलीस हे आमच्यावरती खोटे गुन्हे दाखल करतात त्यातच विनयभंगाचा गुन्हा दाखल करतात. आता बाबा रामदेव यांच्या वक्तव्यामुळे तिथे असलेल्या अनेक माता भगिनींच्या मनामध्ये लज्जा उत्पन्न झाली. तर रामदेव बाबांनी विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करावा. तो ही ३५४ ड या कायद्याअंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी माजी खासदार परांजपे यांनी गृहखाते असलेल्या तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. तसेच आमच्यावर दुसरे कुठे गुन्हा दाखल करतात, तसे आता हिम्मत दाखवून खरे गुन्हे दाखल करावे. असे म्हटले. रामदेव बाबा केलेल्या त्या विधानाला राष्ट्रवादीचा विरोध असून रामदेव बाबा यांचे मानसिक स्वास्थ्य बिघडले असल्याचेही परांजपे यांनी म्हटले.