वाहन चालकावर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2021 04:26 AM2021-06-28T04:26:56+5:302021-06-28T04:26:56+5:30
-------------- दुचाकी चोरीला कल्याण : पूर्वेकडील गवळीनगर परिसरात राहणाऱ्या श्याम भोये यांनी त्यांची दुचाकी ९ जूनला तीसगाव येथील गावदेवी ...
--------------
दुचाकी चोरीला
कल्याण : पूर्वेकडील गवळीनगर परिसरात राहणाऱ्या श्याम भोये यांनी त्यांची दुचाकी ९ जूनला तीसगाव येथील गावदेवी मंदिराच्या बाजूला असलेल्या रस्त्यावर उभी केली होती. तेथून ती गाडी चोरीला गेल्याची घटना सकाळी ११.३० ते दुपारी १ वाजेदरम्यान घडली. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
-----------------------------
मोबाइल लंपास
कल्याण : पश्चिमेतील मिलिंदनगरमध्ये राहणारे अक्षय नेटके हे गुरुवारी रात्री ११.३० वाजता वालधुनी पुलाच्या अलिकडे झोमॅटो पार्सल डिलिव्हरी करून सायकलवरून घरी जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी नेटके यांच्या गळ्यात अडकवलेला मोबाइल खेचून पलायन केले. याप्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात नेटके यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला आहे.
-----------------------
वाहन उभे करण्यावरून वाद
कल्याण : वाहन उभे करण्यावरून झालेल्या वादात कोळसेवाडी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी दाखल झालेल्या तक्रारीवरून सात जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी रात्री ९.४५ वाजेच्या सुमारास पूर्वेतील तीसगाव मंदिराजवळील सद्गुरू कृपा संकुल येथे ही घटना घडली. याप्रकरणी अतिष महादे आणि अशोक साळवे यांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्या आहेत.
------------------------
रोकडे, चव्हाण यांची नियुक्ती
कल्याण : राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या कल्याण- डोंबिवली शहर जिल्हाध्यक्षपदी सुजित रोकडे, तर शहर जिल्हा उपाध्यक्षपदी आदित्य चव्हाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. कल्याण- डोंबिवली जिल्ह्यामध्ये पक्ष संघटना अधिक जोमाने काम करेल, असा विश्वास रोकडे यांनी व्यक्त केला आहे.
-----------------
सोशल मीडिया प्रशिक्षण
डोंबिवली : पक्षाची ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचावीत, यासाठी कल्याण पूर्व विधानसभा क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, युवक, विद्यार्थी, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांना गुरुवारी सोशल मीडियाचे प्रशिक्षण देण्यात आले. पक्षाचे जिल्हा सोशल मीडिया सेलचे अध्यक्ष निरंजन भोसले आणि समीर गुधाटे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यात सारिका गायकवाड, अर्जुन नायर, मीनाक्षी आहेर, सुभाष गायकवाड, अशोक घोडके आदींचे मोलाचे सहकार्य लाभले.
--------------