आधी रोशनी शिंदेंची तक्रार तर दाखल करु घ्या; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

By अजित मांडके | Published: April 6, 2023 02:37 PM2023-04-06T14:37:10+5:302023-04-06T14:38:15+5:30

रोशनी शिंदेला ठाकरे आणि आव्हाडांकडून धोका; शिवसेना महिला आघाडीचे पोलीस आयुक्तांना पत्र

file roshni shinde complaint first ncp jitendra awhad counterattack | आधी रोशनी शिंदेंची तक्रार तर दाखल करु घ्या; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

आधी रोशनी शिंदेंची तक्रार तर दाखल करु घ्या; जितेंद्र आव्हाडांचा पलटवार

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : ठाकरे गटाच्या रोशनी शिंदे हिला झालेल्या मारहाणीनंतर मुंबईत आता तिच्यावर उपचार सुरु आहेत. मात्र तिच्या जीवाला आता उध्दव ठाकरे गटातील नेते उध्दव ठाकरे, आदीत्य, राजन विचारे तसेच राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडून धोका असल्याचा दावा करीत, तिला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी  शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या पत्राद्वारे केली आहे. रोशनी हीचा केवळ वापर करुन घेतला जात असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. परंतु आधी तिची तक्रार तर दाखल करुन घ्या असा पलटवार राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

तीन दिवसांपूर्वी रोशनी शिंदे हिच्यावर हल्ला झाला होता. त्यानंतर ठाण्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. उध्दव ठाकरे यांचे अख्खे कुटुंब ठाण्यात येऊन गेले. तर बुधवारी तिच्यासाठी महाविकास आघाडीने ठाण्यात मोर्चा काढला होता. यातूनच आता आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. त्यात आता शिवसेनेकडून करण्यात आलेल्या अजब मागणीनंतर यात आणखी भर पडणार असल्याचे चित्र आहे. रोशनी हिचा केवळ वापर करुन घेतला जात आहे. तिला उपचारासाठी मुंबईत हलविण्यात आले आहे. या प्रकारावरुन हेच सिध्द होत आहे की रोशनीच्या माध्यमातून ठाकरे आणि राष्टÑवादीचा गट सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न करीत असल्याचेही दिसत असल्याचे त्यांनी म्हंटेल आहे. तसेच उध्दव ठाकरे, आदीत्य ठाकरे, राजन विचारे आणि  राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्याकडूनच रोशनी हिच्या जीवाला धोका असल्याचा दावा मीनाक्षी शिंदे यांनी केला आहे. त्यातही या महिलेची प्रकृती चांगली असून केवळ तिच्या आधारे सहानभुती मिळविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही त्यांनी पोलीस आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हंटले आहे. त्यामुळे तिला पोलीस संरक्षण द्यावे अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.

दुसरीकडे मीनाक्षी शिंदे आव्हाड यांनी टीव्ट करीत समाचार घेतला आहे. राजकारण बाजूला राहूद्या एक म्हणून विचार करा, स्त्रीचे पूर्णत्व हे मातृत्व असते. तिला लाथा बुक्यांनी माहराण झाली हे महाराष्ट्राला माहिती आहे. ताई रोशनी तुमची बहीन आहे कमीत कमी तिची तक्रार तर नोंदवून घ्यायला सांगा असा सल्ला त्यांनी दिला आहे. बाकी खरच तिला संरक्षण द्यायला सांगा नाही तर सगळ्या पोलीस स्टेशनचा स्टाफ कमी आहे, अजून एक कमी होईल, आधीच ५०० पोलीस बंदोबस्त करत आहेत, हे संरक्षण गुडांना दिले गेले असून एक बंधुकधारी पोलीस असे ५०० पोलीस बाहेर आहेत. घोडंबदर सगळे टर्न बंद केले का तर तिथे उभे ठेवायला पोलीसच नाहीत, ५०० पोलीस शिंदे गटाला संरक्षण देण्यासाठी ताई तुमच्या बरोबर किती पोलीस आहेत, रोशनीला मारत असतांना बघायला, असा सवालाही त्यांनी उपस्थित केला आहे. एकूणच आता वातावरण आणखी तापणार असल्याचेच यावरुन दिसत आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: file roshni shinde complaint first ncp jitendra awhad counterattack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.