उल्हासनगर महापालिकेत फाईल घोटाळा?, माजी उपमहापौर टार्गेटवर, आयुक्तांचे चौकशीचे आदेश
By सदानंद नाईक | Published: October 12, 2022 05:25 PM2022-10-12T17:25:45+5:302022-10-12T17:26:28+5:30
Ulhasnagar Municipal Corporation: महापालिका बांधकाम विभागातील विकास कामाची फाईल कर्मचाऱ्याकडून मंगळवारी माजी उपमहापौर जीवन इदनानी यांनी नेल्या प्रकरणी एकच गोंधळ उडाला
- सदानंद नाईक
उल्हासनगर : महापालिका बांधकाम विभागातील विकास कामाची फाईल कर्मचाऱ्याकडून मंगळवारी माजी उपमहापौर जीवन इदनानी यांनी नेल्या प्रकरणी एकच गोंधळ उडाला. आयुक्त अजीज शेख यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश देऊन नोटिसाच्या खुलासा मागितला आहे. तर इदनानी यांनी आपला याप्रकरणाशी काही एक सबंध नसल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
उल्हासनगर महापालिका बांधकाम विभाग नेहमी वादात राहिला असून यापूर्वी एका भाजप नगरसेवकांवर फाईल चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. चोरी प्रकरणी आजी नगरसेवकाने अनेक दिवस पोलीस कष्टडीत घालवले. दरम्यान मंगळवारी माजी उपमहापौर जीवन इदनानी यांनी बांधकाम विभागातील एका महिलेकडून दमदाटी करून विकास कामाच्या दोन फाईल घरी घेऊन गेल्याचा आरोप राष्ट्रवादी पक्षाचे माजी सभागृहनेते भारत गंगोत्री, भाजपचे माजी नगरसेवक प्रदीप रामचंदानी यांनी करून खळबळ उडवून दिली. बांधकाम विभागाचे प्रमुख व शहर अभियंता प्रशांत साळुंके यांनी विभागाच्या एका महिला कर्मचाऱ्यांकडून फाईल खाजगी कार्यालयात नेल्या असून सदर फाईल विभागात आल्याचे म्हटले. तर आयुक्त अजीज शेख यांनी बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याकडून इदनानी फाईल घेऊन जात असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्याचे सांगितले. याप्रकरणी चौकशीचे आदेश देण्यात आले असून संबंधितांना नोटिसा देऊन खुलासा मागितला आहे.
महापालिकेतील विभागातून फाईल चोरी जाऊन नंतर सापडत असल्याच्या घटना नेहमी घडत आहेत. मात्र मंगळवारी घडलेली घटना गंभीर असून महापालिका आयुक्त अजीज शेख यांच्या कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले. तर माजी उपमहापौर जीवन इदनानी यांनी बांधकाम विभागातून फाईल नेल्याची घटनेच्या इन्कार केला. तसेच फाईल नेल्याचा बिनबुडाचा आरोप गंगोत्री व रामचंदानी हे करीत असल्याचे ते म्हणाले. बांधकाम विभागाचा कारभार ४ अभियंता यांच्या खांद्यावर असून कमीतकमी १२ अभियंता पदाची गरज आहे. अपुऱ्या अभियंता पदामुळे विभागात गोंधळ उडाल्याचे बोलले जात आहे.
विकास कामाची फाईल माजी नगरसेवकाकडे?
महापालिकेतील पाणी पुरवठा विभाग, बांधकाम विभाग, विधुत विभाग आदींसह अन्य विभागाच्या विकास कामाच्या फाईल कर्मचाऱ्यांच्या हस्ते एका विभागाकडून दुसऱ्या विभागात जातो. मात्र पालिकेत माजी नगरसेवक हे विकास कामाच्या फाईल हाती घेऊन अधिकाऱ्यांच्या सही साठी वणवण भटकत असल्याचे चित्र आहे. असे प्रकार आयुक्तांनी थांबवावी. अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.