ठाणे पालिकेतील फाईलचोरी प्रकरण: सहाय्यक आयुक्त डॉ. सुनिल शिंदे ‘नॉटरिचेबल’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2020 12:47 AM2020-10-13T00:47:08+5:302020-10-13T00:49:58+5:30
अनधिकृत बांधकामांची आणि कोविड साहित्य खरेदीची फाईल चोरल्याचा आरोप असलेले ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील शिंदे हे शुक्र वारपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. त्यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर २०आॅक्टोबर रोजी ठाणे न्यायालयात सुनावणी होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: बदलीची आॅर्डर निघताच दिव्यातील अनधिकृत बांधकामांची आणि कोविड साहित्य खरेदीची फाईल चोरल्याचा आरोप असलेले ठाणे महापालिकेचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुनील शिंदे हे शुक्र वारपासून ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. डायघर पोलीस ठाण्यात पालिकेने रितसर गुन्हा नोंदविल्यानंतर त्यांच्यावर कारवाईची शक्यता होती. त्यामुळेच अटक टाळण्यासाठी त्यांनी ठाणे सत्र न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने त्यांचा अर्ज राखून २०आॅक्टोबरची तारीख देताच ते आता नॉटरिचेबल झाले आहेत.
ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी सर्व प्रभाग समित्यांमधील सहाय्यक आयुक्तांच्या बदल्यांची आॅर्डर १७ आॅगस्ट रोजी काढली होती. त्यानुसार मुंब्रा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त महेश आहेर यांची दिवा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त पदी बदली झाली. तर दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त डॉ. मोरे यांची निवडणूक विभागात बदली झाली. त्यानंतर दिवा प्रभाग समितीच्या कार्यालयातून संगणक आणि फाईल्स चोरीला गेल्याचे प्रकरण समोर आले. दिव्यातील बेकायदा बांधकामांचा लेखाजोखा असलेली फाईल चोरी केल्याप्रकरणी मोरे यांच्याविरुद्ध डायघर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंततर ३० सप्टेंबर रोजी त्यांच्यावर निलंबनाचीही कारवाई करण्यात आली.
शुक्रवारपासून गैरहजर
पालिका आणि पोलीस तपासात मोरे यांनी बेकायदा बांधकाम आणि कोविड साहित्य खरेदीच्या सुमारे सात फाईल चोरल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात होती. ही अटक टाळण्यासाठी कथित आरोपी मोरे यांनी ठाणे सत्र न्यायालयात अर्ज केला. पालिका आयुक्तांनी मोरे यांच्याविरोधात निलंबनाची कारवाई करताना रोज पालिकेत हजेरी लावण्याचे आदेश दिले होते. मात्र अटकपूर्व जामिनावर न्यायालयाचा कोणताच निर्णय न झाल्याने शुक्र वारपासून सहाय्यक आयुक्त मोरे पालिका मुख्यालयात गैरहजर असून त्यांचा मोबाइलही नॉटरिचेबल आहे.