‘महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या कंगनाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2020 09:00 PM2020-09-07T21:00:28+5:302020-09-07T21:03:03+5:30

ठाण्यातील शिवसैनिकांनीही अभिनेत्री कंगना राणावतविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. मुंबईची तुलना ‘पीओके’ म्हणजेच पाकव्याप्त काश्मीरशी केल्यामुळे तसेच मुंबई पोलिसांची बदनामी केल्याने कंगना हिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

'File treason case against Kangana for defaming Maharashtra' | ‘महाराष्ट्राची बदनामी करणाऱ्या कंगनाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा’

शिवसेनेच्या ठाण्यातील आयटी सेलची श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार

Next
ठळक मुद्दे शिवसेनेच्या ठाण्यातील आयटी सेलची श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रारकंगनाचे मानसिक संतुलन बिघडल्यास मोफत उपचार

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: एकीकडे अभिनेत्री कंगना राणावतविरुद्ध ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांनी थेट विधानसभा अध्यक्षांकडेच तक्रार केलेली असतांना ठाण्यातील शिवसैनिकांनीही तिच्याविरुद्ध श्रीनगर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. मुंबईची तुलना ‘पीओके’ म्हणजेच पाकव्याप्त काश्मीर केल्यामुळे तसेच मुंबई पोलिसांची बदनामी केल्याने कंगना हिच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी केली. शिवसेनेच्या आयटी सेल विभागाने ही तक्रार सोमवारी सायंकाळी केली.
स्थानिक नगरसेवक एकनाथ भोईर, माजी परिवहन सभापती दशरथ यादव आणि कोपरी-पाचपाखाडी विधानसभा आयटी सेना संघटक अ‍ॅड. शैलेश कदम यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने श्रीनगर पोलीस ठाण्यात ही तक्रार दिली.
मुंबईतील आर्थिक केंद्र तसेच मोठी कार्यालय गुजरातमध्ये हलविण्यात आली आहेत. अशा प्रकारचे वातावरण निर्माण करून मुंबईची शान असणारे बॉलिवूड इतर कुठे हलविण्याचा कट तर मुंबईद्रोही लोक किंवा एखादा राजकीय पक्ष शिजविताना दिसत नाही ना ? याचा सखोल शोध घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे. सदर चौकशीत कंगनाचे मानिसक संतुलन बिघडल्याचे निष्पन्न झाले तर शिवसेना आणि आयटी सेना ठाणे तर्फे तिचे मानसोपचार तज्ज्ञांकडे मोफत उपचार करून देण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले. १०६ वीर हुतात्म्यांच्या रक्ताने पावन मुंबईची तुलना काश्मिरशी करणा-या तसेच मुंबई पोलिसांच्या कार्यप्रणालीवर अविश्वास दाखवून त्यांची बदनामी करणाºया कंगणाविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

 

Web Title: 'File treason case against Kangana for defaming Maharashtra'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.