इंटरनेट केबलची उपकरणे चोरणाऱ्या कर्मचाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:47 AM2021-09-24T04:47:09+5:302021-09-24T04:47:09+5:30
मीरा रोड : इंटरनेट केबलची उपकरणे चोरणाऱ्या त्याच कंपनीतील कर्मचाऱ्याविरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात २० सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात ...
मीरा रोड : इंटरनेट केबलची उपकरणे चोरणाऱ्या त्याच कंपनीतील कर्मचाऱ्याविरुद्ध भाईंदर पोलीस ठाण्यात २० सप्टेंबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मीरा रोडच्या हॅप्पी होम संकुलात राहणाऱ्या पिटर वाझ यांचा इंटरनेट व्यवसाय आहे. परंतु, इंटरनेट बंद असल्याच्या ग्राहकांच्या तक्रारी वाढू लागल्याने त्यांनी तपासणी केली असता प्लग, ओएनयू, पोर्टसारखी उपकरणे चोरीला गेल्याचे आढळून येत होते. यामुळे भाईंदर पश्चिमेच्या बालदा भवन परिसरातील सीसीटीव्ही तपासले असता, वांझ यांच्याकडे पूर्वी काम करणारा रणवीर प्रकाश लोकरे ऊर्फ सतीश हा उपकरणे चोरताना आढळून आला. या प्रकरणी रणवीरवर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. वांझ यांचे इंटरनेटचे ग्राहक तुटून अन्य ऑपरेटरना फायदा व्हावा किंवा चोरीच्या उद्देशाने तो चोऱ्या करत असल्याची शक्यता व्यक्त होत आहे.