झाडांवर खिळे मारून फलक लावणाऱ्या कंपनी चालका विरुद्ध गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 10:35 PM2018-12-03T22:35:09+5:302018-12-03T22:35:32+5:30

आठ झाडांवर खिळे ठोकून जाहिरातीचे फलक लावणाऱ्या एका सिक्युरिटी कंपनी चालका विरोधात महापालीकेच्या फिर्यादी नंतर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Filed in a case against one person for napping the trees | झाडांवर खिळे मारून फलक लावणाऱ्या कंपनी चालका विरुद्ध गुन्हा दाखल

झाडांवर खिळे मारून फलक लावणाऱ्या कंपनी चालका विरुद्ध गुन्हा दाखल

Next

मीरारोड - आठ झाडांवर खिळे ठोकून जाहिरातीचे फलक लावणाऱ्या एका सिक्युरिटी कंपनी चालका विरोधात महापालीकेच्या फिर्यादी नंतर भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

शहरातील बेकायदा बॅनर , जाहिरात फलक आदींवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने महादेव बन्दीछोडे यांची नियुक्ती केली असून भाईंदर पश्चिमेस प्रभाग समिती क्र . २ च्या हद्दीत पालिकेच्या सार्वजनिक झाडांवर खिळे ठोकून जाहिरातीचे फलक लावले होते . आठ झाडांवर असे फलक लावले गेल्याचे आढळून आले. बन्दीछोडे यांनी प्रभाग अधिकारी गोविंद परब यांना या बाबतचा अहवाल दिला.  

त्या अनुषंगाने जाहिरातदार भारत सिक्युरिटी ग्रुप चा रवी पांडे रा . एकॉर्ड , गोरेगाव पूर्व याच्या विरोधात नागरी झाडांचे जतन व संरक्षण तसेच मालमत्ता विरूपण अधिनियमा खाली गुन्हा दाखल करण्यास परब यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली . त्या नुसार हा गुन्हा दाखल झाला आहे. 

शहरात सर्रासपणे झाडांच्या फांद्या तोडून वा झाडांना खिळे ठोकून , तार - दोरीने बांधून बेकायदा जाहिरात फलक लावले जातात तसेच विद्युत रोषणाई केली जात आहे . या मुळे झाडांना इजा होऊन पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे . पण वृक्ष प्राधिकरण विभागाचे अधिकारी मात्र झाडांच्या होणाऱ्या ऱ्हासाकडे सातत्याने डोळेझाक करत असल्याने झाडांवर बेकायदा फलक , रोषणाई आदी करणाऱ्यांना मोकळं रान मिळालं आहे . 

Web Title: Filed in a case against one person for napping the trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.