आणखी एका बोगस पत्रकार वर खंडणीचा गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2021 10:39 PM2021-08-09T22:39:23+5:302021-08-09T22:39:23+5:30
मीरा भाईंदर मध्ये आणखी एका बोगस पत्रकारावर अनधिकृत बांधकामात खंडणी प्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - मीरा भाईंदर मध्ये आणखी एका बोगस पत्रकारावर अनधिकृत बांधकामात खंडणी प्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. चंदनसिंह ठाकूर असे खंडणी मागणाऱ्या बोगस पत्रकार असे नाव आहे.
मीरारोडच्या शिवार उद्यान मागे तक्रारदाराने भागीदारीत क्रिकेट टर्फ व स्नुकर एका शेड मध्ये चालवत होता. महापालिका आरक्षणाच्या मोकळ्या जागेत हा बेकायदा क्रिकेट टर्फ व स्नुकर टेबल असल्याची लेखी तक्रार करून पालिका अधिकाऱ्यां कडे कारवाईचा तगादा ठाकूर याने गेल्या वर्षां पासून चालवला होता. तर तक्रारदारा कडून त्याने ८० हजारांची खंडणी मागितली होती. तक्रारदाराने त्याच्या सांगण्या वरून १० हजार रुपये राघवेंद्र दुबे नावाच्या इसमाच्या खात्यात टाकले.
पण उर्वरित ७० हजार रुपयांची मागणी करत त्याने तक्रारी सुरूच ठेवल्या होत्या. पालिकेनी एकवेळा तोडक कारवाई केली मात्र त्यांनी ती अर्धवट कारवाई केली म्हणून पुन्हा त्याने तक्रारी केल्या.
तक्रारदाराने पोलीस आयुक्त सदानंद दाते यांच्या कडे तक्रार केल्यावर मीरारोड पोलिसांनी चंदनसिंह ठाकूर वर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. आरोपी ठाकूर फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. मीरारोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजयसिंह बागल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक शिवकुमार गायकवाड हे करत आहेत.
अनेक बेकायदा व अनधिकृत बांधकामाच्या हा पत्रकार म्हणून करत होता. तो स्वतःला नांदेड जिल्ह्यातील लोकअपेक्षा वेब पोर्टल तसेच मुंबई शहर साप्ताहिकचा पत्रकार सांगत फिरत असे. त्याच्या विरुद्ध उत्तन येथील एकाने देखील खंडणी मागत असल्याची तक्रार पोलिसात केली होती. या आधी महिन्या भरा पूर्वी भाईंदरच्या राई, शिवनेरी येथील सरकारी जागेत अनधिकृत बांधकाम करणाऱ्यां कडून खंडणी उकळणाऱ्या दोन बोगस पत्रकारांना पोलिसांनी अटक केली होती.