उल्हासनगरातील ओमी कलानी टीमच्या दोन पदाधिकाऱ्यांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 04:18 PM2021-08-08T16:18:07+5:302021-08-08T16:18:33+5:30
पालकांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून गुन्हे दाखल.
सदानंद नाईक
उल्हासनगर : ओमी कलानी टीमचे युवक कार्याध्यक्ष पंकज त्रिलोकानी यांच्यासह अधोगपती रोशन माखीजा यांच्यावर उल्हासनगर पोलीस ठाण्यात पॉक्सो अंतर्गत शुक्रवारी गुन्हा दाखल झाला. राजकीय वादातून पंकज त्रिलोकानी यांच्यावर गुन्हा दाखल झाल्याची प्रतिक्रिया ओमी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी दिली.
उल्हासनगर ओमी कलानी टीमचे युवक अध्यक्ष पंकज त्रिलोकानी व उघोगपती रोशन माखीजा आदी दोघे जण पक्षाच्या एका कार्यकर्त्याच्या घरी १४ मे २०२१ रोजी जेवण करण्यासाठी गेले होते. त्यावेळी घरी कार्यकर्ता व त्याची अल्पवयीन मुलगी घरी होती. जेवण बाहेरून आणण्यासाठी कार्यकर्त्याला घरा बाहेर पाठवून दोघांनी मुलीवर अत्याचार केला. झालेला प्रकार मुलीने वडिलांना सांगितला. मात्र भीतीपोटी तक्रार दाखल केली नव्हती. अखेर शुक्रवारी मुलगी व मुलीच्या वडिलांनी उल्हासनगर पोलीस ठाणे गाठून पंकज त्रिलोकानी व रोशन माखीजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी दोघांवर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केल्याने एकच खळबळ उडाली.
पंकज त्रिलोकानी यांच्यासह इतरांवर काही महिन्यांपूर्वी खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. यातून बाहेर येत नाही तोच पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याने ओमी टीममध्ये खळबळ उडाली आहे. मात्र ओमी कलानी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी राजकीय वैमनस्यातून गुन्हे दाखल झाल्याचा आरोप केला आहे.