‘सूर राइझिंग स्टार्स’चा अंतिम सोहळा आज ठाण्यात
By admin | Published: February 3, 2017 03:40 AM2017-02-03T03:40:05+5:302017-02-03T03:40:05+5:30
मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रम देऊन लहान पडद्यावर आपल्या नावाच्या रंगाची सप्तरंगी उधळण करणारे एकमेव चॅनल म्हणजे कलर्स चॅनल.
ठाणे : मनोरंजनाच्या दुनियेत एकापेक्षा एक सरस कार्यक्रम देऊन लहान पडद्यावर आपल्या नावाच्या रंगाची सप्तरंगी उधळण करणारे एकमेव चॅनल म्हणजे कलर्स चॅनल. आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक भावनांचे रंग टिपून त्या भावनांचे एका वेगळ्या रंगात सिरीयल्सद्वारे सादरीकरण करून कलर्स चॅनलने प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. ज्याप्रमाणे लोकमत सखी मंचची गेल्या १६ वर्षांपासून घोडदौड सुरू आहे आणि सातत्याने विविध उपक्रमांच्या माध्यमातून लोकमत सखी मंचने प्रत्येकाच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे.
प्राथमिक फेरीतील निवडक १५ स्पर्धकांची शुक्रवार (३ फेब्रु) होणार कलाअविष्कार म्हणजेच ‘सूर राइझिंग स्टार्स’चा अंतिम सोहळा. कलर्स व लोकमत सखी मंच आयोजित सूर राइझिंग स्टार्सचे हा गायन स्पर्धेचा कार्यक्रम ३ फेब्रुवारीला कोरम मॉल इस्टर्न एक्सप्रेस हायवे, ठाणे पश्चिम येथे ५.३० वा. होणार आहे. १८ वर्षांच्या वर कुणीही स्त्री किंवा पुरुष यात सहभागी होऊ शकतात. सर्व वाचकांना अंतिम फेरी बघण्यासाठी आमच्यातर्फे खास आमंत्रण. सुप्रसिद्ध गायक मंदार आपटे या कार्यक्रमाचे परीक्षक असतील.
कलर्स चॅनलवर येणाऱ्या या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे हा कार्यक्रम लाईव्ह दिसणार आहे. इतर शोसारखे जजेस समोर येऊन कलाकारांना परफॉर्मन्स द्यायचा नसून कलाकारांचा लाईव्ह परफॉर्मंन्स बघून जनतेला वोटिंग करायचे आहे. वोट करणाऱ्याचा चेहरा स्क्रिनवर झळकणार आहे. अतिशय आगळ्या वेगळ्या अशा या कार्यक्रमाचे सेलिब्रेटी जजेस आहे.
विख्यात गायक आणि संगीतकार शंकर महादेवन, गायिका मोनाली ठाकूर, अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ एकूण जनतेच्या आणि सेलिब्रेटी जजेसच्या निर्णयावर ठरणार राइझिंग स्टार - बघायला विसरू नका आणि सूर राइझिंग स्टार्सचे या कार्यक्रमात भाग घ्यायला विसरू नका. कलर्स आणि लोकमत सखी मंचचा हा कार्यक्रम निश्चितच तुम्हा आम्हा सर्वांच्याच पसंतीचा ठरणार यात शंका नाही. अधिक माहितीकरिता संपर्क - ९८७०९१२२३३ / ८६५२२००२२६.