फॅशन आयकॉन-२०१८ ची महाअंतिम फेरी, पाचशे हून अधिक स्पर्धकांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2018 02:43 AM2018-12-28T02:43:10+5:302018-12-28T02:43:28+5:30
अविका एंटरटेन्मेंट आयोजित मिस्टर, मिस आणि मिसेस फॅशन आयकॉन-२०१८ हे ब्युटी पेजेंट ठाण्यात रंगले होते.
ठाणे : अविका एंटरटेन्मेंट आयोजित मिस्टर, मिस आणि मिसेस फॅशन आयकॉन-२०१८ हे ब्युटी पेजेंट ठाण्यात रंगले होते. यात मिसेस फॅशन आयकॉन-२०१८ च्या विजेत्या करिष्मा लाड, मिस फॅशन आयकॉन-२०१८ च्या विजेत्या तानिया राणे, तर मिस्टर फॅशन आयकॉन-२०१८ चे विजेते विश्वजित देशमुख ठरले.
प्रथमच आयोजित केलेल्या या कार्यक्रमात तब्बल ५०० हून अधिक स्पर्धकांचा उत्स्फूर्त सहभाग होता. यात मिसेस फॅशन आयकॉन-२०१८ च्या पहिल्या रनरअप प्रणिता मोंडकर, दुसऱ्या रनरअप स्मिता साबळे ठरल्या. मिस फॅशन आयकॉन-२०१८ च्या पहिल्या रनरअप मुस्कान सलुजा, दुसºया रनरअप प्राची पाटील, तर मिस्टर फॅशन आयकॉन २०१८ चे पहिले रनरअप राजवीर नागराज, दुसरे रनरअप हिमांशू सुर्वे ठरले. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते. यातून, ४० स्पर्धकांची निवड अंतिम फेरीसाठी झाली असून ही महाअंतिम फेरी २३ डिसेंबर रोजी ठाण्यातील रोझबेल बँक्वेट येथे पार पडली. महाअंतिम फेरीला प्रमुख पाहुणे म्हणून महापौर मीनाक्षी शिंदे, एस.के. ग्रुप आॅफ कंपनीजचे संजीव कुमार, लोकमतचे सहायक उपाध्यक्ष विजय शुक्ला उपस्थित होते.
कॉस्च्युम डिझायनर म्हणून ‘पोशाख’चे चारू आणि हनी, नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ इंटिरिअर अॅण्ड फॅशन डिझायनिंग (रोझी बोन्स), ‘एलमास’च्या गीता थोरात, तर अभिनेत्री नगमा अख्तर, अभिनेता अर्जुन यादव आणि अभिनेता तसेच मॉडल फेस आॅफ वामन हरी पेठे ज्वेलर्स हितेन मेघरजानी जजेस होत्या.
निवेदन महाराष्टÑ प्रेस्टिजिअस रत्न अवार्ड विजेती डॉ. सौंदर्या गर्ग
यांनी केले.