अंतिम टप्यातील आवास योजनेच्या घरांना सरकारने तत्परतेने मान्यता देण्याची गरज - पडणवीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2020 06:28 PM2020-03-01T18:28:04+5:302020-03-01T18:33:56+5:30

येथील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये दि.ठाणे डिस्ट्रीक को. आॅपरेटिव्ही हौसिंग फेडरेशनतर्फे गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन मेळावा रविवारी घेण्यात आला. त्याप्रसंगी फडणवीस ठाण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनय सहस्त्रबुध्दे, आमदार संजय केवळकर, भाजपा शहर अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे आणि फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे आदी उपस्थित होते.

 The final stage housing scheme houses need to be approved immediately by the government - fall | अंतिम टप्यातील आवास योजनेच्या घरांना सरकारने तत्परतेने मान्यता देण्याची गरज - पडणवीस

फडणवीस म्हणाले की कुठला मजला कोणी घेतला याची मला चिंता नाही

googlenewsNext
ठळक मुद्दे* आपण वरच्या मजल्याची आशा धरून बसलो नाही -महाविकास आघाडी सरकारमधील धूसमुस सुरू यावेळी चव्हाट्यावर वरच्या मजला मलाच पाहिजे अशा प्रकारचा आडमुठ्ठेपणाही सुरू

ठाणे : प्रधानमंत्री आवास योजनेचे ठाणे परिसरासह भिवंडी रोडवरील एक लाख घरांचा प्रकल्प आणि वसई-विरार परिसरात अनेक प्रकल्पांव्दारे सामान्य माणसाला घरे मिळणे शक्य आहे. या योजनेच्या अंतिमटप्यातील या प्रस्तावांवर सरकारने लवकरच निर्णय घेण्याची गरज आहे.त्यामुळे या घरांचा लोकाना मोठ्याप्रमाणात लाभ घेता येणार आहे. यासाठी आपण शासनाशी बोलणार असल्याचे सुतोवाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
     येथील राम गणेश गडकरी रंगायतनमध्ये दि.ठाणे डिस्ट्रीक को. आॅपरेटिव्ही हौसिंग फेडरेशनतर्फे गृहनिर्माण संस्थांसाठी मार्गदर्शन मेळावा रविवारी घेण्यात आला. त्याप्रसंगी फडणवीस ठाण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर खासदार विनय सहस्त्रबुध्दे, आमदार संजय केवळकर, भाजपा शहर अध्यक्ष व आमदार निरंजन डावखरे आणि फेडरेशनचे अध्यक्ष सिताराम राणे आदी उपस्थित होते. यावेळी फडणवीस म्हणाले की ठाणे लोकसख्या वाढत आहे. त्यासाठी ‘इज आॅफ लिव्हींग’साठी दीड ते दोन वर्षांच्या परिश्रमातून क्लस्टर योजनेचा निर्णय ठाण्यातील जुन्या इमारतींसाठी घेतल्याचे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. पंतप्रधान आवास योजनेच्या लाभासाठी ठाणे जिल्ह्यातून एक लाखघरांचे प्रस्ताव आले आहे. त्यासाठी ठाणे, भिवंडी रोडवरील या एक लाख घरांच्या प्रकल्पास आणि वसई - विरार परिसरातील अनेक प्रकल्पावर शासनाने लवकरच निर्णय घेण्याची अपेक्षा आहे. या घरांच्या योजना आता अंतिम टप्यात आहे. त्यातील घरांचा लाभ सामान्य माणसाला मोठ्याप्रमाणात होणार आहे. इतर गोष्टीना या सरकारने स्थगीती दिली आहे. पण या घरांच्या प्रकल्पाला स्थगीती मिळालेली नसल्यामुळे सरकारने त्यास वेगाने मान्यता देऊन सामान्य जनतेला घरांचा लाभ करून द्यावा, अशी अपेक्षा ही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
* आपण वरच्या मजल्याची आशा धरून बसलो नाही -
     या नवीन सरकारमधील वरचा मजला मलाच पाहिजे आशा आडमुठ्ठे प्रकाराविषयी सहस्त्रबुध्दे यांनी यावेळी चर्चा केली. त्यावर फडणवीस म्हणाले की कुठला मजला कोणी घेतला याची मला चिंता नाही. वरचा मजला मला कधी मिळेल यांची आशा घेऊन मी बसलेला नाही. आपल्याला त्याची काळजी करण्याचे कारण नाही. आपण जनतेच्या कोर्टात जाणारे लोक आहोत. जनताही सुप्रिम आहे. त्यांच्या आधारावर चालणार आहे. जनतेचे वकील म्हणून आपण ताकदीने त्यांच्या समस्या या सरकार पुढे मांडून पूर्ण करणार आहोत. काळजीचे कारण नसल्याचेही त्यांनी यावेळी सत्तेविषयी बोलताना स्पष्ट केले. तर स्वयं पुनर्विकास धोरणाची देखील अंमलबजावणी होईपर्यंत आपण शांत बसणार नसल्याचेही त्यांनी गृहनिर्माण संस्थांच्या मार्गदर्शनास अनुसरून स्पष्ट केले.
* सरकारचे नाव न घेता सहस्त्रबुध्दे म्हणाले की, जनादेशाच्या जमिनीवरील ईमारतीत दुसरा-तिसराच कोणी घुसतो आणि ती बळकवतो. वैचारिकतेचा विचार न करता इमारत चकचकीत असल्याचे केवळ भासवली जात आहे. पण तीन - चार महिन्यात या भूसभुसीत जमिनीवरील ईमारत आता खिळखिळी झाली आहे. ज्या जनादेशाची जमीन आहे, त्या मुळमालकाला ती मिळावी आणि तसा संपूर्णपणे पुनर्विकास राजकारणातही व्हावा, ही जनतेच्या मनातील इच्छा असल्याचे सांगून त्यांनी नाव न घेता महाविकास आघाडी सरकारमधील धूसमुस सुरू यावेळी चव्हाट्यावर आणली. वरच्या मजला मलाच पाहिजे अशा प्रकारचा आडमुठ्ठेपणाही सुरू असल्याचे सहस्त्रबुध्दे यांनी सरकारचे नाव न घेता सांगितले.
      * ट्रकच्या वाहतूक कोंडीतून मुक्त करण्याचे प्रयत्न - ट्रक वाहतुकीमुळे ठाणे शहर व जिल्ह्यात होत असलेली वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी रेल्वे व जेएनपीटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठका घेतल्या जात असल्याचेही सहस्त्रबुध्दे यांनी स्पष्ट करून आजही रेल्वेच्या अधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली असल्याचे सुतोवाच त्यांनी केले. तर जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाच्या दृष्टीकोणातून आर्किटेक्चर कॉलेजेसच्या अभ्यास क्रमात त्यांचा समावेश करणेही शक्य असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट करून केंद्र सरकारच्या माध्यमातून आपण त्यासाठी प्रयत्न करण्याचेही त्यांनी सांगितले.

Web Title:  The final stage housing scheme houses need to be approved immediately by the government - fall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.