अखेर ‘ते’आधारकार्ड केंद्र पडले बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2018 04:16 PM2018-02-15T16:16:23+5:302018-02-15T16:19:59+5:30
डोंबिवली: केडीएमसीच्या येथील विभागीय कार्यालयात आधारकार्ड मिळण्याची व्यवस्था नागरीकांसाठी उपलब्ध करून दिली होती. परंतू नोंदणी (टोकण)कुठे करायची यावरून झालेल्या वादात हे कें द्र गुरूवारपासून बंद करण्यात आले आहे. तांत्रिक कारणामुळे आधारचे काम बंद राहील असा फलक कें द्राबाहेर लावण्यात आला असून केंद्र चालक कैलास डोंगरे यांनी सोयी सुविधा पुरविण्याबाबत केडीएमसीकडे मागणी केल्याने आता महापालिकेच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.

महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील वाचनालयाच्या जागेत राज्यमंत्री व आमदार रवींद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने कायमस्वरूपी आधारकार्ड केंद्र सुरू करण्यात आले आहे. आधारकार्डासाठी याठिकाणी मध्यरात्रीपासूनच नागरीकांच्या रांगा लागतात. परंतू तीनपैकी केवळ दोन युनिटच सध्या चालू असल्याने रांगा लावूनही नंबर लागत नसल्याने नागरीकांची पुरती परवड झाली आहे. दरम्यान केंद्रावर वाढती गर्दी आणि मध्यरात्रीपासून बाहेर लागत असलेल्या रांगा पाहता सुरक्षेच्या अनुषंगाने केंद्रचालक डोंगरे यांनी नवीन आधार नोंदणी व सुधारीत आधार कार्डसाठी टोकण हे सावरकररोडवरील जाणता राजा कार्यालयात सायंकाळी ४ ते ५ यावेळेत मिळेल असे फलक केंद्राबाहेर लावले होते. पण याला आरटीआय कार्यकर्ते महेश निंबाळकर यांनी हरकत घेत नोंदणी एखादया राजकीय (भाजपच्या) पक्षाच्या कार्यालयात का? असा सवाल केला. यावर डोंगरे यांनी नोंदणीसाठी निंबाळकर यांच्याशी संपर्क साधावा असे फलक केंद्राबाहेर लावल्याने दोघांमध्ये बुधवारी जोरदार वाद झाला होता. या वादात नागरीक वेठीला धरले गेलेच त्याचबरोबर हे केंद्र बंद पडण्याची शक्यता वर्तविली जात होती. ती शक्यता गुरूवारी प्रत्यक्षात उतरली. त्रांतिक कारण पुढे करीत हे केंद्र बंद करण्यात आले आहे. त्यामुळे सकाळपासूनच केंद्रावर आधारकार्ड काढण्यासाठी आलेल्या नागरीकांना बंदच्या सूचना पाहून माघारी परतावे लागले. दरम्यान नोंदणीच्या उदभवलेल्या वादानंतर आता विभागीय कार्यालयातूनच टोकण देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पण केंद्रावर मनुष्यबळाची कमतरता आणि सुरक्षेचा अभाव असल्याने नोंदणीसाठी मनुष्यबळ महापालिकेने पुरवावे अशी मागणी केंद्रचालक डोंगरे यांनी ग प्रभाग क्षेत्र अधिकारी परशुराम कुमावत यांच्याकडे केली आहे. यावर महापालिकेडून कोणती कार्यवाही होते याकडे लक्ष लागले आहे. मात्र जोपर्यंत मनुष्यबळ पुरविले जात नाही तोपर्यंत केंद्र चालू न करण्याचा निर्णय घेतल्याचे डोंगरे यांनी लोकमतला सांगितले.