अखेर....उल्हासनगर महापालिका डम्पिंग ग्राऊंडच्या जागेवरील अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2021 03:47 PM2021-03-18T15:47:55+5:302021-03-18T15:48:40+5:30
Ulhasnagar News : राणा खदान डम्पिंग ग्राऊंडच्या पायथ्याशी उभे राहिलेल्या अवैध बांधकाम प्रकरणी सर्वस्तरातून महापालिकेवर टीकेची झोळ उठल्यावर बुधवारी सहायक आयुक्त अनिल खतुरानी यांच्या पथकाने बांधकामावर पाडकाम कारवाई केली.
- सदानंद नाईक
उल्हासनगर - राणा खदान डम्पिंग ग्राऊंडच्या पायथ्याशी उभे राहिलेल्या अवैध बांधकाम प्रकरणी सर्वस्तरातून महापालिकेवर टीकेची झोळ उठल्यावर बुधवारी सहायक आयुक्त अनिल खतुरानी यांच्या पथकाने बांधकामावर पाडकाम कारवाई केली. राजकीय वरदहस्तमुळे पाडकाम कारवाई होत नसल्याचे बोलले जात होते.
उल्हासनगरात गेल्या एका वर्षात शेकडो आरसीसी व टिग्रेटरचे अवैध बांधकामे उभे राहिले असून महापालिकेने बघ्याची भूमिका घेतल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला. राणा डम्पिंगच्या पायथ्याशीचा कचरा जेसीबी मशीनच्या मदतीने बाजूला करून अवैध चाळीचे बांधकाम राजकीय नेत्याच्या आशीर्वादाने भूमाफियाने सुरू केले. उन्हाळ्यात आगीने तर पावसाळ्यात कचऱ्याचा ढिग सदर बांधकामावर कोसळून वित्त व जीवितहानी होण्याची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त करून कारवाई मागणी केली. मात्र सहायक आयुक्त अनिल खतूराणी यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. असा आरोप सर्वस्तरातून झाला. दोन दिवसापूर्वी भाजपचे आमदार कुमार आयलानी, भाजपचे शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक महेश सुखरामनी आदींच्या शिष्टमंडळानें महापालिका आयुक्त डॉ राजा दयानिधी यांची भेट घेऊन शहरातील अवैध बांधकामसह अन्य समस्या बाबत निवेदन दिले.
अखेर ...आयुक्तांच्या आदेशानव्हे प्रभारी सहायक आयुक्त अनिल खतूराणी यांच्या पथकाने पोलीस संरक्षणात राणा खदानच्या पायथ्याशी असलेल्या अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई केली. गेल्या महिन्यात डम्पिंग शेजारील एका मोठया अवैध बांधकामावर सहायक आयुक्त अनिल खतूराणी यांच्या पथकाने वाजतगाजत पाडकाम कारवाई केली. मात्र राजकीय दबावामुळे सदर बांधकाम जैसे थे उभे राहिले. महापालिकेची धडक पाडकाम कारवाई ठप्प पडल्याने, शहरात अवैध बांधकामाचा सुळसुळाट झाल्याचा आरोप होत आहे. अवैध बांधकामाला संबंधित प्रभाग अधिकारी, स्थानिक नगरसेवक, विविध पक्षाचे नेते व भूमाफिया जबाबदार असल्याचे बोलले जाते. महापालिकेवर शिवसेना आघाडीची सत्ता आल्यापासून, अवैध बांधकामाला सुगीचे दिवस आल्याची टीका भाजपकडून होत आहे.
इतर अवैध बांधकामावर कारवाई कधी?
महापालिकेच्या नाकावर टिकचून उभे राहत असलेल्या अवैध बांधकामावर पाडकाम कारवाई कधी? असा प्रश्न आजच्या कारवाई नंतर विचारला जात आहे. उल्हासनगर पूर्व रेल्वे स्टेशन परिसरात रस्ता रुंदीकरणाच्या नावाखाली आरसीसी अनेक बांधकामे उभी राहत आहे. त्यावर कारवाई करण्याची मागणी होत आहे.