अखेर एसीपी निपुंगेंवर प्रशासकीय कारवाईला सुरुवात, मुख्यालय प्रमुखांनी काढली हजर होण्याची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: September 13, 2017 11:00 PM2017-09-13T23:00:11+5:302017-09-13T23:01:20+5:30

ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांच्यावर प्रशासकीय कारवाईला पोलीस आयुक्तालयाने सुरुवात केली आहे. ते वैद्यकीय रजेच्या कारणास्तव गेल्या आठवडाभरापासून गैरहजर आहेत.

Finally, the administrative proceedings of ACP Nipungen, the head of the head, issued notice | अखेर एसीपी निपुंगेंवर प्रशासकीय कारवाईला सुरुवात, मुख्यालय प्रमुखांनी काढली हजर होण्याची नोटीस

अखेर एसीपी निपुंगेंवर प्रशासकीय कारवाईला सुरुवात, मुख्यालय प्रमुखांनी काढली हजर होण्याची नोटीस

Next

- जितेंद्र कालेकर

ठाणे, दि. 13 - ठाणे शहर पोलीस मुख्यालयातील महिला कॉन्स्टेबल सुभद्रा पवार आत्महत्या प्रकरणातील कथित आरोपी सहायक पोलीस आयुक्त (एसीपी) एस.बी. निपुंगे यांच्यावर प्रशासकीय कारवाईला पोलीस आयुक्तालयाने सुरुवात केली आहे. ते वैद्यकीय रजेच्या कारणास्तव गेल्या आठवडाभरापासून गैरहजर आहेत. हजर व्हा, अन्यथा तुमच्यावर प्रशासकीय कारवाई केली जाईल, अशा आशयाची नोटीस त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी बजावल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुभद्रा या कॉन्स्टेबलने कळवा येथील तिच्या घरी ६ सप्टेंबर रोजी आत्महत्या केली. त्याच दिवसापासून निपुंगे हे देखील ठाणे शहर नियंत्रण कक्षाला कळवून सिक (वैद्यकीय) रजेवर निघून गेले. परंतु, त्यांनी मुख्यालय-२ चे उपायुक्त संदीप पालवे किंवा मुख्यालय-१ च्या उपायुक्त डॉ. प्रिया नारनवरे यांच्यापैकी कोणालाही याबाबतची माहिती दिली नाही. शिवाय, कळवा पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध महिला पोलीस कॉन्स्टेबल सुभद्रा हिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल आहे. आता त्यांनी वैद्यकीय रजा घेतली असली, तरी त्याबाबतची कोणतीही अधिकृत कागदपत्रे दिलेली नाहीत. गेले सात दिवस त्यांची वाट पाहिल्यानंतर मुख्यालय-२ चे उपायुक्त पालवे यांनी त्यांना बुधवारी पुणे येथील निवासस्थानी नोटीस बजावली आहे.

काय म्हटले आहे नोटीसमध्ये...
‘आपण सिक रिपोर्ट केला आहे. मात्र, मेडिकल रिपोर्ट दिले नाहीत. एकतर, मेडिकल रिपोर्ट सादर करा किंवा स्वत: कर्तव्यावर हजर व्हा. या दोन्हींपैकी काहीच केले नाहीतर तुमच्यावर पुढील प्रशासकीय कारवाई केली जाईल’, असे या नोटीसमध्ये म्हटले आहे.

काय होऊ शकते कारवाई...
विनाकारण गैरहजर राहिल्यास वैद्यकीय कारणातही तथ्य आढळले, नाहीतर निपुंगे यांना सक्त ताकीद, सक्तीची रजा किंवा थेट निलंबनापर्यंतही कारवाई होऊ शकते, अशी माहिती एका वरिष्ठ पोलीस अधिका-याने ‘लोकमत’ला दिली. त्यामुळे आत्महत्येच्या प्रकरणात तपास अधिकारी सहायक पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्यापुढे किंवा प्रशासकीय वरिष्ठ अधिकारी संदीप पालवे यांच्यापैकी कुठेतरी निपुंगे यांना हजर राहण्याशिवाय पर्याय नाही. कळवा पोलीस ठाण्याच्या कलम ३०६ च्या प्रकरणात जर तथ्य आढळले, तर त्यांच्यावर अटकेचीही कारवाई होऊ शकते, असेही या अधिकाºयाने सांगितले.
 

 

Web Title: Finally, the administrative proceedings of ACP Nipungen, the head of the head, issued notice

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस