अखेर १० वर्षांनंतर वारकरी भवनला लाभला मुहुर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:26 AM2021-07-21T04:26:48+5:302021-07-21T04:26:48+5:30

ठाणे : मागील १० वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या वारकरी भवनचा शुभारंभ अखेर आषाढी एकादशीच्या दिवशी करण्यात आला आहे. ...

Finally, after 10 years, Warkari Bhavan got a moment | अखेर १० वर्षांनंतर वारकरी भवनला लाभला मुहुर्त

अखेर १० वर्षांनंतर वारकरी भवनला लाभला मुहुर्त

Next

ठाणे : मागील १० वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या वारकरी भवनचा शुभारंभ अखेर आषाढी एकादशीच्या दिवशी करण्यात आला आहे. ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे व महापौर नरेश म्हस्के यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. या उद्घाटन प्रसंगी हभप माधव महाराज घुले मठाधिपती इगतपुरी यांच्या कीर्तनाचे आयोजन केले होते. कार्यक्रमास महापालिकेतील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

ठाणे शहरातून अनेक दिंड्या पंढरपूरच्या दिशेने जात असत. ठाणे शहरात वारकऱ्यांची संख्या अधिक असल्याने आनंद दिघे यांची ठाणे शहरात वारकरी भवन होण्याची इच्छा होती. खासदार राजन विचारे त्यावेळी तत्कालीन नगरसेवक असताना, त्याचा पाठपुरावा करून, राम मारुती रोड, नौपाडा येथे वारकरी भवनाच्या इमारतीची निर्मिती केली. त्याचे भूमिपूजन २००७ साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते, त्यानंतर, तयार झालेल्या इमारतीचे लोकार्पण १९ डिसेंबर, २०११ रोजी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते केले होते, परंतु शहर विकास विभागाकडे ताबा न मिळाल्याने इमारत तयार होऊनही धूळखात पडली होती. या वारकरी भवनाच्या इमारतीतील पहिला मजला ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे, दुसरा मजला श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउली सेवामंडळ व तिसरा मजला अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा या संस्थांना देण्यासाठी ठाणे महानगरपालिकेने २० ऑक्टोबर, २०१६ रोजी एकमताने ठराव केला होता, परंतु २०१७ला ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाच्या इमारती धोकादायक झाल्याने, न्यायालयीन कामकाजासाठी महानगरपालिकेने वारकरी भवनाची इमारत ६ ते ८ महिन्यांच्या मुदतीवर जिल्हा सत्र न्यायालयाला दिली होती. वारकरी भवनाच्या इमारतीतील पहिला मजल्यावर न्यायालीन दस्तावेज ठेवल्याने पहिल्या मजल्याचा ताबा मिळेपर्यंत तळमजला व तिसरा मजला श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउली सेवा मंडळ, दुसरा मजला ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखा यांना गडकरी रंगायतन येथे तात्पुरत्या स्वरूपात जागा उपलब्ध करून देण्यात आल्याची ताबा पावती देण्यात आली आहे.

दरम्यान, ८ जून, २०२१ रोजी प्रमुख न्यायाधीश ठाणे जिल्हा सत्र न्यायालय जोशी यांना ठाणे महापालिकेचे आयुक्त डॉ.विपिन कुमार शर्मा यांच्यासोबत श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माउली सेवा मंडळ ठाणे, ज्येष्ठ नागरिक संघ मध्यवर्ती समिती ठाणे, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे प्रतिनिधित्व करणारे शिष्टमंडळ न्यायाधीशांना भेटले होते. त्यावेळी वारकरी भवनातील पहिल्या मजल्यावरील जागा आम्ही लवकरात लवकर रिकामी करू, असे आश्वासन दिले आहे.

.............

Web Title: Finally, after 10 years, Warkari Bhavan got a moment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.