अखेर अडगळीतील बाईक ॲम्ब्युलन्स रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:36 AM2021-04-14T04:36:48+5:302021-04-14T04:36:48+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णसेवेसाठी दिलेल्या बाईक ॲम्ब्युलन्स अडगळीत पडल्याप्रकरणी मनसेने मार्च महिन्यात आंदोलन केले होते. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णसेवेसाठी दिलेल्या बाईक ॲम्ब्युलन्स अडगळीत पडल्याप्रकरणी मनसेने मार्च महिन्यात आंदोलन केले होते. अखेर या आंदोलनाला यश आले असून गेली अनेक दिवस खितपत पडलेल्या या बाईक रुग्णांच्या सेवेसाठी रस्त्यावर धावू लागल्या आहेत.
प्रभाग क्रमांक १४ चे शाखाध्यक्ष राजेंद्र कांबळे यांनी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आणला होता. ठामपा आयुक्तांच्या आदेशाने दाट लोकवस्ती, डोंगराळ भाग अशा ठिकाणी जिथे रुग्णसेवेसाठी आपत्कालीन व्यवस्था लवकर पोहचू शकत नाही, अशा प्रभागांसाठी ठाणे महानगरपालिकेने ४५ लाख रुपये खर्च करून ३० ॲम्ब्युलन्स बाईकची खरेदी केली होती. त्या स्थानिक आरोग्य केंद्रांना आपत्कालीन स्थितीतील रुग्णसेवेसाठी दिल्या होत्या. परंतु, त्यांचा उपयोग झाला नव्हता. या संदर्भात मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करून. कोरोनाकाळात त्यांचा वापर रुग्णसेवेसाठी करावा, अशी मागणी यावेळी केली होती. आयुक्त शर्मा यांनी याबाबत योग्य निर्णय घेऊन अखेर या बाईक ॲम्ब्युलन्सचा वापर रुग्णसेवेसाठी करण्याचे आदेश दिले. ओवळा-माजिवडा विधानसभा सचिव सौरभ नाईक, प्रभाग अध्यक्ष नीलेश चौधरी यांनी या प्रकरणाचा सतत पाठपुरावा केला.