अखेर परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाण्यात दाखल झाला खंडणीचा गुन्हा
By जितेंद्र कालेकर | Published: July 30, 2021 10:17 PM2021-07-30T22:17:01+5:302021-07-31T00:02:08+5:30
ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुरु वारी आणखी एक खंडणी वसूलीचा गुन्हा दाखल झाला आहे. क्रि केट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ही तक्रार दाखल केली आहे.
ठाणे : ठाणे आणि मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासह २८ जणांविरुद्ध ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुरु वारी आणखी एक खंडणी वसूलीचा गुन्हा दाखल झाला आहे. क्रि केट बुकी सोनू जलान आणि केतन तन्ना यांनी ही तक्रार दाखल केली आहे. गेले दोन दिवस तक्रारदाराचा जबाब नोंदविल्यानंतर हा गुन्हा दाखल झाला आहे. ठाणेनगर पोलिसांनी यामध्ये परमबीर सिंग यांच्यासह निवृत्त पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा, खंडणी विरोधी पथकाचे तत्कालीन वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार कोथमिरे, सहाय्यक पोलीस आयुक्त एन. टी. कदम आदी अधिकाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.
ठाणे पोलीस आयुक्तालयातच परमबीर सिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेला हा तिसरा गुन्हा आहे. परमबीर यांच्याच आदेशाने प्रदीप शर्मा आणि राजकुमार कोथमिरे यांच्यासह काही अधिकाऱ्यांनी धमक्या देऊन साडे तीन कोटी रु पये उकळल्याचा गंभीर आरोप क्रि केट बुकी सोनू जालान आणि केतन तन्ना यांनी केला होता. हा सारा प्रकार ठाणे खंडणी विरोधी पथकाच्या कार्यालयातच घडल्याने ठाणेनगर पोलिसांनी फिर्यादींचा जबाब नोंदवण्याचे काम गुरु वारी हाती घेतले होते. यातील जाब जबांसह अनेक पुरावेही पोलिसांना दिल्याचे सोनू जालान याने दावा केला. यामध्ये संजय पुनामिया, विकास दाभाडे, रवी पुजारी, विमल अग्रवाल, बरखा अग्रवाल, किशोर अग्रवाल, रितेश शाह आणि मुजावर आदी खासगी व्यक्तींचाही समावेश आहे.
मोक्का अंतर्गत खोटा गुन्हा दाखल करु न त्यातून सुटकेसाठी आणि पोलीसांचा मार वाचविण्यासाठी एक कोटी १८ लाखांची मागणी करुन सिंग यांच्या सांगण्यावरून शर्मा यांनी हे पैसे घेतल्याचा आरोप केतन तन्ना यांनी या तक्रारीमध्ये केला आहे.
पोलिसांची पंचाईत-
आपल्याच माजी पोलीस आयुक्ताविरुद्ध खंडणीसारखे गंभीर स्वरुपाचे गुन्हे एकामागून एक दाखल होत असल्याने ठाणेनगर पोलिसांसह पोलीस उपायुक्तांपासून ते पोलीस आयुक्तांपर्यंत अनेक पोलीस अधिकाºयांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे फोन घेण्याचे किंवा याबाबत माहिती देण्याचे टाळले. विशेष म्हणजे यासंदर्भात काढलेल्या प्रसिद्धीपत्रकातही परमबीर सिंग यांच्यासह कोणत्याही आरोपीचे नाव येणार नाही, याचीही पोलिसांनी पद्धतशीरपणे काळजी घेतली. शिवाय, कोणताही अधिकारी यावर भाष्य करणार नाही, असेही बजावण्यात आल्याने ठाणेनगर पोलिसांसह सर्वच अधिकाºयांची याबाबत काय माहिती द्यायची, याबाबत चांगलीच पंचाईत झाल्याचे शुक्रवारी पहायला मिळाले.