अखेर दिघा रेल्वे स्थानकाला मुहूर्त सापडला, रेल्वे विकास महामंडळाने निविदा मागविल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2018 02:30 AM2018-02-25T02:30:34+5:302018-02-25T02:30:34+5:30

नवी मुंबईतील दिघा या नव्या रेल्वे स्थानकासाठी अखेर मध्य रेल्वेला उशिरा का होईना मुहूर्त सापडला आहे. यासाठी कळवा स्थानकानजीक उड्डाणपूल, फलाटांतील फेरबदल, अतिक्रमणे हटवून संरक्षण भिंत आणि दिघा रेल्वे स्थानक बांधण्यासाठी मध्य रेल्वेने अखेर निविदा मागविल्या आहेत.

Finally, the Digha railway station was found, the Railway Development Corporation invited tender | अखेर दिघा रेल्वे स्थानकाला मुहूर्त सापडला, रेल्वे विकास महामंडळाने निविदा मागविल्या

अखेर दिघा रेल्वे स्थानकाला मुहूर्त सापडला, रेल्वे विकास महामंडळाने निविदा मागविल्या

googlenewsNext

- नारायण जाधव

ठाणे : नवी मुंबईतील दिघा या नव्या रेल्वे स्थानकासाठी अखेर मध्य रेल्वेला उशिरा का होईना मुहूर्त सापडला आहे. यासाठी कळवा स्थानकानजीक उड्डाणपूल, फलाटांतील फेरबदल, अतिक्रमणे हटवून संरक्षण भिंत आणि दिघा रेल्वे स्थानक बांधण्यासाठी मध्य रेल्वेने अखेर निविदा मागविल्या आहेत. एमयूटीपी अर्थात मुंबई शहरी वाहतूक प्रकल्पांतर्गत मुंबई रेल्वे विकास महामंडळ ही कामे करणार असून त्यावर पहिल्या टप्प्यात १०७ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत. कर्जत-कसारापर्यंतच्या प्रवाशांना ठाण्याला न येता थेट कल्याणमार्गे नवी मुंबईला जाता यावे यासाठी हे स्थानक महत्त्वाचा दुवा ठरणार आहे.
ठाणे आणि वाशी-पनवेल मार्गावर सध्या ठाण्यानंतर ऐरोली हे स्थानक आहे. या दोन्ही स्थानकांतील अंतर ५.७६ किमी आहे. रेतीबंदर नजीकचा पूल आणि दिघा रेल्वे स्थानक हे दोन्ही प्रकल्प कळवा-ऐरोली या ४२८ कोटींच्या उन्नत मार्गाचाच भाग आहेत. त्यातीलच दिघा रेल्वे स्थानक येत्या तीन वर्षांत उभे करण्याचा रेल्वेचा मानस आहे.
सध्याच्या ऐरोली नॉलेज पार्कसमोर हे स्थानक उभे करण्यात येणार आहे. नॉलेज पार्कमधील पटनी कॉम्प्युटर्ससह इतर आयटी कंपन्या आणि कळवा ईस्ट, विटावा, दिघा परिसर तसेच तेथील एमआयडीसी उद्योगांतील कामगारांना हे स्थानक सोयीचे ठरणार आहे. माजी खासदार संजीव नाईक यांनी दिघासह पावणे स्थानक व्हावे, यासाठी त्यांच्या कार्यकाळात पाठपुरावा केला होता. त्यानंतर विद्यमान खासदार राजन विचारे यांनीही काही दिवसांपूर्वी रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन कल्याणहून थेट ऐरोलीमार्गे नवी मुंबईला जाता यावे यासाठी आवश्यक असलेला कळव्याच्या रेतीबंदरनजीकचा उड्डाणपूल आणि दिघा रेल्वे स्थानक लवकर मार्गी लागावे, यासाठी तेथील अतिक्रमणे काढून इतर अत्यावश्यक परवानग्या तत्काळ द्याव्यात अशी मागणी केली होती. त्यानंतर आता रेल्वे विकास महामंडळाने ही अतिक्रमणे हटविण्यासह दिघा रेल्वे स्थानकाच्या बांधकामासाठी या निविदा मागविल्या आहेत. मार्च अखेरपर्यंत त्या उघडण्यात येणार असून त्यानंतर पुढील कामांना सुरुवात करण्यात येणार आहे.

ठाणे स्थानकावरील ताण कमी होणार
सध्या कसारा-कर्जतच्या प्रवाशांना नवी मुंबईला रेल्वेमार्गे जायचे झाल्यास कल्याणमार्गे ठाणे स्थानकातून उतरून नंतर ट्रान्स हार्बरमार्गे नवी मुंबईला जावे लागते.
मात्र, कळव्यानजीक पारसिक डोंगरराजीजवळ वळण घेणारा उड्डाणपूल बांधल्यास ठाण्याला न येता थेट ऐरोलीमार्गे नवी मुंबईला जाता येणार आहे. त्यासाठी ठाणे आणि ऐरोली या दोन स्थानकांच्या मध्ये दिघा हे नवे रेल्वे स्थानक बांधण्यात येणार आहे.
हा मार्ग कार्यान्वित झाल्यास कर्जत-कसारा भाागातील प्रवाशांना ठाण्याला न येता थेट नवी मुंबईला जाणे सोपे होणार असून त्यात त्यांचा वेळ, पैशाची बचत होईलच; शिवाय ठाणे स्थानकावरील ताणही कमी होणार आहे.

Web Title: Finally, the Digha railway station was found, the Railway Development Corporation invited tender

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे