अखेर ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाची जयजित सिंह यांनी सूत्रे स्वीकारली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 26, 2021 01:35 AM2021-05-26T01:35:06+5:302021-05-26T01:36:53+5:30

राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून विवेक फणसळकर यांची ठाण्यातून बढतीवर बदली झाल्यानंतर मंगळवारी राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंह यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्रे सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांच्याकडून घेतली.

Finally, Jayjit Singh accepted the post of Thane Police Commissioner | अखेर ठाण्याच्या पोलीस आयुक्तपदाची जयजित सिंह यांनी सूत्रे स्वीकारली

 विवेक फणसळकर यांच्या बढतीनंतर २० दिवसांनी नियुक्तीचे आदेश

googlenewsNext
ठळक मुद्दे विवेक फणसळकर यांच्या बढतीनंतर २० दिवसांनी नियुक्तीचे आदेश

लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे: राज्य पोलीस गृहनिर्माण व कल्याण महामंडळामध्ये व्यवस्थापकीय संचालक म्हणून विवेक फणसळकर यांची ठाण्यातून बढतीवर बदली झाल्यानंतर मंगळवारी राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख जयजीत सिंह यांनी ठाण्याच्या पोलीस आयुक्त पदाची सूत्रे सह पोलीस आयुक्त डॉ. सुरेश मेकला यांच्याकडून घेतली. फणसळकर यांच्या बदलीनंतर तब्बल २० दिवसांनी राज्याच्या गृहविभागाने या रिक्त पदावर सिंह यांची नियुक्ती केली.
ठाण्याचे २४ वे पोलीस आयुक्त म्हणून सिंह यांनी अखेर आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. मुंबई पाठोपाठ राज्यात बहुचर्चित असलेल्या ठाणे पोलीस आयुक्त पदासाठी कोणाची वर्णी लागणार यावरुन अनेक खलबते सुरु होती. अखेर गृह विभागाने सोमवारी रात्री राज्य दहशतवाद विरोधी पथकाचे प्रमुख सिंह यांची या पदावर नियुक्ती केल्यानंतर त्यांनी मंगळवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास पदभार घेतला. पोलीस आयुक्त कार्यालयाच्या आवारात सिंह यांना मुख्यालयाच्या अधिकारी कर्मचारी यांच्यासह स्वागताची सलामी (गार्ड आॅफ आॅनर) दिल्यानंतर सह पोलीस आयुक्त डॉ. मेकला यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. मितभाषी तसेच कर्तव्यकठोर असलेले सिंह हे शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. दहशतवाद विरोधी पथकातही त्यांनी आपल्या कामाची चुणूक दाखविली होती.
* मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अंटालिया इमारतीजवळ जिलेटीनच्या कांडया असलेली मोटारकार मिळाली होती. याच मोटारीचे ठाण्यातील मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपासही तत्कालीन एटीएस प्रमुख सिंह यांच्या अधिपत्याखालील पथकांनी यशस्वी केला होता. हिरेन कुटूंबीयांनी मुंबईचे तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांच्यावर खूनाचा आरोप केल्यानंतर याप्रकरणी एटीएसने तात्काळ गुन्हा दाखल केला होता. ५ मार्च २०२१ रोजी आकस्मिक मृत्युचा मुंब्रा पोलीस ठाण्यातील गुन्हा ६ मार्चला एटीएसला वर्ग झाला. त्याच दिवशी हा खूनाचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर क्रिकेट बुकी नरेश गौर आणि निलंबित कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांना याप्रकरणी अटक केली होती. वाझेचाही ताबा एटीएसने न्यायालयात मागितला होता. मात्र तो घेण्यापूर्वी हे संपूर्ण प्रकरण एनआयएकडे वर्ग झाले होते.
अतिरिक्त पोलीस महासंचालकपदी बढती झाल्यानंतर रेल्वे, लाचलुचपतप्रतिबंधक विभाग आणि एटीएस प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्याआधी मुंबईत परिमंडळ दहाच्या उपायुक्तपदीही ते होते. कामातील गतिमानता वाढविण्यासाठी तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करुन घेण्यातही त्यांचा आपल्या अधिकाऱ्यांना आग्रह असतो.
* सूत्रे घेताच अधिकाऱ्यांची बैठक-
ठाण्यात पोलीस आयुक्त पदाची सूत्रे घेताच सह आयुक्त डॉ. मेकला, अतिरिक्त पोलीस आयुक्त प्रविण पवार, संजय येनपुरे, उपायुक्त बाळासाहेब पाटील, लक्ष्मीकांत पाटील आणि श्रीकृष्ण कोकाटे आदी सर्व वरिष्ठ अधिकाºयांची त्यांनी तातडीने बैठक घेतली. बुधवारी असलेल्या बुद्धपोर्णिमा बंदोबस्ताचा आढावा घेतानांच ठाण्यातील कायदा सुव्यवस्था तसेच कोरोना संदर्भात सुरु असलेल्या निर्बंधाबाबत आपल्या अधिकाºयांकडून त्यांनी माहिती घेतली.

Web Title: Finally, Jayjit Singh accepted the post of Thane Police Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.