अखेर पत्रकारांनी हातात झाडू घेत स्वच्छ केला केडीएमसी कार्यालयातील पत्रकार कक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 10:16 PM2019-07-13T22:16:07+5:302019-07-13T22:16:34+5:30

कमालीची अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे हैराण झालेल्या पत्रकारांनी शनिवारी महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील पत्रकार कक्षामध्ये झाडू हातात घेऊन स्वच्छता अभियान केले.

Finally journalists cleaned up the press office of the KDMC office | अखेर पत्रकारांनी हातात झाडू घेत स्वच्छ केला केडीएमसी कार्यालयातील पत्रकार कक्ष

अखेर पत्रकारांनी हातात झाडू घेत स्वच्छ केला केडीएमसी कार्यालयातील पत्रकार कक्ष

Next

डोंबिवली - कमालीची अस्वच्छता, दुर्गंधी यामुळे हैराण झालेल्या पत्रकारांनी शनिवारी महापालिकेच्या विभागीय कार्यालयातील पत्रकार कक्षामध्ये झाडू हातात घेऊन स्वच्छता अभियान केले. गेले दीड महिना प्रचंड अस्वच्छता झाली होती. विभागीय कार्यालयात ग आणि फ प्रभागाचे अधिकारी कार्यरत असतात, परंतु  तरीही पत्रकार कक्षात प्रचंड धूळ, घाण झाली होती. याबाबत आयुक्त गोविंद बोडके, शिवसेना शहरप्रमुख राजेश मोरे यांच्यासह सर्वच राजकीय लोकप्रतिनिधी या ठिकाणी येत असतात. परंतु तरीही अस्वच्छता असल्याने पत्रकारांना बसायला देखील दुर्गंधी येत असल्याने अखेरीस शनिवारी विविध माध्यमांच्या पत्रकारांनी एकत्र येत स्वच्छता मोहीम राबवली. त्या सगळ्यांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले, त्यानंतर माहापौर विनिता राणे यांनी दखल घेत प्रभाग अधिकाऱ्यांना चांगलेच फैलावर घेतले होते. सोमवारपासून त्या विभागात स्वच्छता ठेवण्यात येईल असे आश्वासन प्रभाग अधिकाऱ्यांनी दिले.

Web Title: Finally journalists cleaned up the press office of the KDMC office

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.