अखेर ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाकडून महेश आहेर यांची तासभर झाली चौकशी

By अजित मांडके | Published: March 17, 2023 02:27 PM2023-03-17T14:27:33+5:302023-03-17T14:28:06+5:30

आहेर यांच्या विरोधात कारवाई न झाल्याने अखेर आव्हाड यांनी या संदर्भातील मुद्दा विधानसभेत उपस्थित केला होता.

Finally Mahesh Aher was interrogated for an hour by Thane Crime Investigation Department | अखेर ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाकडून महेश आहेर यांची तासभर झाली चौकशी

अखेर ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाकडून महेश आहेर यांची तासभर झाली चौकशी

googlenewsNext

ठाणे - राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी महापालिकेतील वादग्रस्त सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांच्या विरोधात आवाज उठविल्यानंतर आणि ठाणे कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी देखील आहेर पासून आपल्याला धोका असल्याची तक्रार केल्यानंतर अखेर ठाणे पोलिसांनी आहेर यांची चौकशी सुरु केली असल्याची माहिती पुढे आली आहे. गुरवारी त्यांची तासभर चौकशी झाली असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.

काही दिवसांपूर्वी  राष्ट्रवादीकडून आहेर यांची कथीत ऑडिओ क्लिप वारयल करण्यात आली होती. यात आव्हाड यांच्या कुटुंबींना जिवे मारण्याची धमकी त्यात देण्यात आली होती. या ऑडिओ क्लिपनंतर  राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी आहेर यांना महापालिका मुख्यालयाच्या प्रवेशद्वारावर माहराण केली होती. त्यानंतर आव्हाड यांच्यासह त्यांच्या काही पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. तर आहेर यांच्या विरोधात कारवाईची मागणी देखील राष्ट्रवादीने पोलिसांकडे केली होती. परंतु तरी देखील त्यांची साधी चौकशी देखील करण्यात आली नव्हती. दुसरीकडे आव्हाड यांनी आहेर यांच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. परंतु एवढे होऊनही आहेर यांच्या विरोधात कारवाई न झाल्याने अखेर आव्हाड यांनी या संदर्भातील मुद्दा विधानसभेत उपस्थित केला. त्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची चौकशी सीआयडीमार्फत केली जाईल असे आश्वासन दिले होते.

दरम्यान दुसरीकडे ठाणे कॉंग्रेसचे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत आपल्या कुटुबियांना देखील आहेर यांच्याकडून धोका असल्याचा आरोप केला होता. तसेच या संदर्भातील पत्र देखील त्यांनी पोलिसांना दिले होते. त्यानंतर आता सीआयडी बरोबरच ठाणे गुन्हे अन्वेशन विभागाकडून आहेर यांची चौकशी सुरु झाली असल्याची माहिती पुढे आली आहे. ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी गुरुवारी आहेर यांना चौकशीसाठी बोलावले होते. सुमारे तासभर आहेर यांची चौकशी करण्यात आली. विक्रांत चव्हाण यांनी केलेल्या आरोपांविषयी ही चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Web Title: Finally Mahesh Aher was interrogated for an hour by Thane Crime Investigation Department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.