मनसेच्या थाळीनाद आंदोलनाला अखेर मिळाली पोलीस परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2020 07:18 PM2020-09-15T19:18:21+5:302020-09-15T19:18:51+5:30

तीन दिवसांपूर्वी नाकारली होती  परवानगी  

Finally police permission got for MNS thalinad andolan | मनसेच्या थाळीनाद आंदोलनाला अखेर मिळाली पोलीस परवानगी

मनसेच्या थाळीनाद आंदोलनाला अखेर मिळाली पोलीस परवानगी

Next
ठळक मुद्देसोशल डिस्टन्सिंग पाळत, मास्क घालत, हातात फलक घेऊन आणि थाळी नाद करत हे आंदोलन करणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.  

ठाणे : गुरुवारी पत्रकार परिषदेत घोषित केल्यानुसार 17 तारखेला थाळीनाद आंदोलन करण्यासाठी नौपाडा पोलीस स्टेशनला परवानगी मागितली असता , जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव , शहर अध्यक्ष रविंद्र मोरे , उप शहर अध्यक्ष पुष्कर विचारे यांना तात्काळ परवानगी नाकारून कलम 188 भा.दं.वि.तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 सह इतर कायद्यान्वये कारवाई करण्याची नोटीस बजावण्यात आली होती.

पोलिसांच्या परवानगीला झुगारून हे आंदोलन करणार असल्याची भूमिका मनसेने घेतली होती. परंतु आज अखेर पोलिसांनी आंदोलनावर बंधने घालत परवानगी दिली. नियमाप्रमाणे आंदोलन केले जाईल असा पवित्रा मनसेने घेतला आहे. सोशल डिस्टन्सिंग पाळत, मास्क घालत, हातात फलक घेऊन आणि थाळी नाद करत हे आंदोलन करणार असल्याचे अविनाश जाधव यांनी सांगितले.  

निवडणूक जिंकण्यासाठी दिलेल्या आश्वासनांपैकी एक "500 फुटांपर्यंत क्षेत्रफळ असणाऱ्या घरांना मालमत्ता करमाफी " हे होते. याची आठवण करून देण्यासाठी हे आंदोलन करण्यात येणार आहे. यावेळी शिवसेनेने दिलेले वचननामा फलकांवर लिहिला जाणार आहे. 10 जणांना आंदोलनात परवानगी दिल्याचे जाधव यांनी सांगितले.

 

अन्य महत्वाच्या बातम्या...

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

 

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

 

उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे

 

इडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

प्रशांत भूषण यांनी भरला १ रुपयाचा दंड अन् सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका

 

दिशा सालियान आणि सुशांत राजपूत मृत्यू यामधील रोहन रॉय महत्त्वाचा दुवा; नितेश राणेंचा दावा

 

 

Web Title: Finally police permission got for MNS thalinad andolan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.