अखेर रणजित कुमार स्वगृही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2020 01:00 AM2020-09-20T01:00:34+5:302020-09-20T01:00:38+5:30
ठाणे महापालिकेतील महासभेत ठराव मंजूर : सर्वपक्षीयांचा पाठिंबा, आयुक्तांच्या निर्णयाकडे लक्ष
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ठाण्यात कोरोनाचा वाढता कहर आटोक्यात आणण्यासाठी काही महिन्यांपूर्वी ठाणे महापालिकेत आणखी एका आयएएस अधिकाऱ्याची नियुक्ती केली होती. परंतु, १५-१५ दिवस ते हजरच नसल्याचा मुद्दा शुक्रवारी झालेल्या महासभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी उपस्थित केला. ते असून नसल्यासारखेच असल्याने त्यांना शासनाकडे पुन्हा पाठविण्याचा ठराव राष्ट्रवादीचे नगरसेवक नजीब मुल्ला यांनी मांडला, त्याला राम रेपाळे यांनी अनुमोदन दिल्यानंतर तो मंजूर करण्यात आला.
ठाण्यात कोरोनाचा कहर वाढत असताना मे महिन्यात यातून सावरण्यासाठी आणखी एका आयएएस अधिकाºयाची नियुक्ती करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधींनी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती. त्या अनुषंगाने अखेर शासनाने ही विनंती मान्य करून मे महिन्यात आयएएस असलेले रणजितकुमार यांची नियुक्ती केली होती.
दिवसेंदिवस ठाणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून ही अतिशय चिंतेची बाब आहे. त्यामुळे मुंबईत ज्या पद्धतीने तात्पुरत्या स्वरूपात पाच आयएएस अधिकारी घेण्यात आले होते, त्याच धर्तीवर ठाण्यातही अशा प्रकारे रणजित कुमार यांची नियुक्ती केली होती. परंतु,जेव्हापासून ते रुजू झाले तेव्हापासून त्यांच्याकडून आपल्या मर्जीप्रमाणो काम सुरू असल्याचा आरोप नजीब मुल्ला यांनी शुक्रवारच्या महासभेत केला. त्यांच्याकडून परस्पर निर्णय घेतले जात होते, महापालिकेच्या इतर कोणत्याही अधिकाºयाला विश्वासात घेतले जात नव्हते. त्यातही कोरोनाच्या या महामारीत ते १५ ते २० दिवस हजरच नसायचे. आयुक्त डॉ. विपिन शर्मा हे चांगल्या प्रकारे काम करीत आहेत.
त्यामुळे आणखी आयएएस अधिकाºयाची गरज नसल्याचे मत सर्वपक्षीय नगरसेवकांनी व्यक्त केले. अखेर मुल्ला यांनी, रणजित कुमार यांना शासनाकडे परत पाठवा, असा ठराव मांडला असता त्याला स्थायी समिती सभापती राम रेपाळे यांनी अनुमोदन दिल्यानंतर तो मंजूर करण्यात आला.
१५-२० दिवस हजर नसायचे
महापालिकेच्या कोणाही अधिकाºयाला विश्वासात घेतले जात नव्हते. त्यातही कोरोनाच्या या महामारीत ते १५ ते २० दिवस हजरच नसायचे. आयुक्त विपिन शर्मा हे चांगले प्रकारे काम करीत आहेत.