अखेर सभापतींना प्रभाग अधिकारी मिळाला, पण लिपीक नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2018 08:06 PM2018-01-08T20:06:44+5:302018-01-08T20:07:47+5:30
प्रभाग समितीसाठी पूर्णवेळ प्रभाग अधिकारी व लिपीक प्रशासन देत नसल्याच्या निषेधार्थ दालनास टाळे ठोकणारे सभापती संजय थेराडे यांना अखेर आज पूर्णवेळ प्रभाग अधिकारी पालिकेने दिला.
मीरा रोड - प्रभाग समितीसाठी पूर्णवेळ प्रभाग अधिकारी व लिपीक प्रशासन देत नसल्याच्या निषेधार्थ दालनास टाळे ठोकणारे सभापती संजय थेराडे यांना अखेर आज पूर्णवेळ प्रभाग अधिकारी पालिकेने दिला. अजून लिपीक मात्र दिला नसला तरी थेराडे यांनी दालनाचे टाळे काढत पुन्हा कामकाज सुरू केले आहे.
सत्ताधारी भाजपाच्या सभापतींनी पदभार स्विकारला तरी प्रभाग अीधकारीच नसल्याने प्रभाग समिती ४ चे संजय थेराडे व प्रभाग समिती ६ चे सभापती आनंद मांजरेक र यांनी आपल्या दालनांना टाळी ठोकली होती. परिणामी प्रभाग समिती ६ साठी अधिकारी देण्यात आला.
परंतु प्रभाग समिती ३ व ४ साठी एकच प्रभाग अधिकारी दिला गेला. स्वतंत्र प्रभाग अधिकारी देण्याची मागणी थेराडे यांनी २ डिसेंबर रोजी आयुक्तां कडे करुन देखील प्रभाग अधिकारी तर नाहिच शिवाय एक लिपीक सुद्धा प्रशासनाने न दिल्याने गेल्या आठवड्यातील गुरुवारी थेराडे यांनी आपल्या दालनास पुन्हा टाळे ठोकले.
अखेर आज सोमवारी प्रभाग अधिकारी म्हणुन सुनिल यादव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रभाग अधिकारी दिल्याने थेराडे यांनी आज आपल्या दालनाचं टाळे काढुन पुन्हा कामकाज सुरु कलंय. लिपीक सुध्दा लवकरच दिला जाणार असल्याचं आश्वासन प्रशासनानं दिलंय.
लिपीकाची गरज असली तरी प्रभाग अधिकारी दिल्याने आपण कामकाज सुरु केलं आहे. प्रभाग निहाय स्थानिक नगरसेवकांना सोबत घेऊन प्रभागांची पाहणी सुरु करणार आहोत असं थेराडे म्हणाले. पाहणी दौरयात परिसरातील समस्या, प्रलंबित विकास कामं याचा आढावा घेतानाच नागरीकांशी संवाद साधणार असल्याचे ते म्हणाले.