अखेर महापालिकेचा बुलडोझर आला; अंबरनाथ पोलीस स्टेशनची जुनी इमारत तोडली
By पंकज पाटील | Published: April 1, 2023 06:37 PM2023-04-01T18:37:38+5:302023-04-01T18:38:09+5:30
अंबरनाथ पश्चिमेला असलेली पोलीस इमारत ही अतिशय जुनी असल्याकारणाने या इमारतीत पडझड व्हायला सुरुवात झाली होती.
अंबरनाथ: अंबरनाथ पश्चिमेला असलेली जुनी पोलीस इमारत तोडण्याचे काम अखेर पालिकेने हाती घेतलं आहे. ही इमारत धोकादायक झाल्याने पोलीस स्टेशन स्थलांतरित करण्यात आले होते. या ठिकाणी आता नवीन पोलीस स्टेशन उभारले जाणार आहे.
अंबरनाथ पश्चिमेला असलेली पोलीस इमारत ही अतिशय जुनी असल्याकारणाने या इमारतीत पडझड व्हायला सुरुवात झाली होती. तसेच पावसाळ्यात या इमारतीत पाणी देखील गळत असे यामुळे कामकाजात मोठा अडथळा निर्माण होत होता. तसेच इमारत लहान असल्याकारणाने पोलीस कर्मचाऱ्यांना ही इमारत अपुरी पडत होती. त्यामुळे जुनी इमारत तोडून नवीन इमारत उभारण्याचे काम केले जाणार आहे. या कारणाने गेल्या काही महिन्यांपूर्वी पोलीस स्टेशनच्या मागील बाजूस पोलीस स्टेशनची राखीव जागा आहे. याच जागेत हे पोलीस स्टेशन तात्पुरते स्थलांतरित करण्यात आले आहे. आता जुनी इमारत तोडून भाव पोलीस स्टेशन चे इमारत उभारली जाणार आहे. सोबतच बहुमजली पोलीस वसाहतीचा प्रस्ताव देखील आहे.