वृध्द दाम्पत्याच्या खून प्रकरणात अखेर दाेघांना अटक; चितळसर पाेलिसांनी लावला छडा
By जितेंद्र कालेकर | Published: February 16, 2024 11:56 PM2024-02-16T23:56:13+5:302024-02-16T23:56:43+5:30
विशेष म्हणजे हे आराेपीही त्याच इमारतीमध्ये वास्तव्यास हाेते. तरीही ते पाेलिसांना गेल्या दीड महिन्यांपासून गुंगारा देत हाेते.
ठाणे : घोडबंदर येथील मानपाडा भागातील रेंटलच्या इमारतीमधील एका सदनिकेतील समशेर बहादूर सिंह (६८) आणि मिना समशेर सिंह (६५) या वृध्द दाम्पत्यांच्या खून प्रकरणात अखेर २५ आणि २७ वषीर्य दाेन आराेपींना अटक करण्यात िचतळसर पाेलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे हे आराेपीही त्याच इमारतीमध्ये वास्तव्यास हाेते. तरीही ते पाेलिसांना गेल्या दीड महिन्यांपासून गुंगारा देत हाेते.
या मीना दाम्पत्याचा ५ जानेवारी २०२४ राेजी त्यांच्या घरातच संशयास्पद मृतदेह आढळले होते. गळा दाबून त्यांची हत्या केल्याची माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली हाेती. त्यानुसार याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल झाला हाेता.
समशेर आणि मिना .या दोघांच्याही अंगावर कोणत्याही जखमा आढळल्या नव्हत्या. घरातून सामान देखील चोरीला गेले नव्हते. अंबरनाथमध्ये राहणाºया त्यांच्या मुलाने याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे हत्येचा गुन्हा दाखल झाला हाेता. मानपाडा येथील ठाणे महापालिकेच्या दोस्ती एम्पेरिया या इमारतीतील १४ व्या मजल्यावरील एका सदनिकेत हे दाम्पत्य वास्तव्याला होते. मुलगा सुधीर हा अंबरनाथमध्ये त्याच्या कुटुंबासोबत वास्तव्यास आहे. उदरनिर्वाह करण्यासाठी समशेर हे परिसरातील गृहसंकुलामध्ये सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. तर त्यांची पत्नी घरातून दूध विक्रीचा व्यवसाय करीत हाेती. सुधीर हा दररोज त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत असे. आई आणि वडिलांचे मोबाईल बंद असल्याने ४ जानेवारी राेजी रात्री ७ वाजताच्या सुमारास आई-वडिलांना ताे भेटण्यासाठी मानपाडा येथील त्यांच्या निवासस्थानी आला. त्यावेळी घराचा अर्धवट दरवाजा उघडा होता. त्यावेळी दाेघांचेही संशयास्पद मृतदेह आढळल्याने सुधीर यांनी चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली हाेती.
याप्रकरणी खूनाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलिस निरीक्षक गिरीश गाेडे यांच्या पथकाने हा तपास केला. यामध्ये त्याच इमारतीमधील दाेघांना तब्बल दीड महिन्यांनी गुरुवारी अटक केल्याची माहिती सूत्रांनी दिली. सखाेल तपास सुरु असल्याने यातील आराेपींची नावे उघ्ड करता येणार नसल्याचे पाेलिसांनी सांगितले.