संच्युरी कंपनीच्या टँकर स्फोटात मृत झालेल्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत व एकाला नोकरी

By सदानंद नाईक | Published: September 23, 2023 05:26 PM2023-09-23T17:26:47+5:302023-09-23T17:26:59+5:30

संच्युरी कंपनीत नायट्रोजन टँकरचा स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू तर २ जण गायब झाले.

Financial assistance to the family of the deceased in the tanker explosion of Century Company and employment to one | संच्युरी कंपनीच्या टँकर स्फोटात मृत झालेल्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत व एकाला नोकरी

संच्युरी कंपनीच्या टँकर स्फोटात मृत झालेल्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत व एकाला नोकरी

googlenewsNext

उल्हासनगर : संच्युरी कंपनीत नायट्रोजन टँकरचा स्फोट होऊन २ जणांचा मृत्यू तर २ जण गायब झाले. मृत झालेल्या कामगारांच्या कुटुंबाला आर्थिक मदत व एकाला नोकरी देण्याचे कंपनी व्यवस्थापनाने निर्णय घेतल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी दिली. 

उल्हासनगर कॅम्प नं-१, शहाड गावठाण येथील संच्युरी कंपनीच्या प्लांट मध्ये नायट्रोजन टँकरची तपासणी करीत असतांना शनिवारी सकाळी सव्वा अकरा वाजता स्फोट झाला. स्फोटात शैलेश यादव व राजेश श्रीवास्तव या कामगारांचा मृत्यू झाला असून टँकर चालक पवन यादव व कंपनीचा कामगार अनंत डोंगोरे हे मिसिंग आहेत. तर एकून ६ कामगार जखमी झाले आहेत. कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल ललका यांनी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात मृत कामगारांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत व एका सदस्यांला कंपनीत नोकरी देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती दिली. तसेच जखमी कामगाराच्या उपचारा बाबत कंपनी चांगला निर्णय घेणार असल्याचे संकेत मेहुल ललका यांनी दिली आहे.

Web Title: Financial assistance to the family of the deceased in the tanker explosion of Century Company and employment to one

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.