मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळांना आर्थिक निधी

By नितीन पंडित | Published: February 8, 2023 06:18 PM2023-02-08T18:18:18+5:302023-02-08T18:18:34+5:30

नितीन पंडित भिवंडी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने भिवंडीत लोकसभा संपर्क प्रमुख ...

Financial fund for Goshalas on the occasion of Chief Minister's birthday | मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळांना आर्थिक निधी

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गोशाळांना आर्थिक निधी

googlenewsNext

नितीन पंडित

भिवंडी - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ५९ व्या वाढदिवसानिमित्त बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या वतीने भिवंडीत लोकसभा संपर्क प्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी बुधवारी अनगाव,वाडा,वालशिंद,व म्हसा या चार ठिकाणी असलेल्या गोशाळांना भेट देऊन प्रत्येकी ५९ हजार रुपये आर्थिक मदत केली. त्यांनतर शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालय व कसारा येथील उपजिल्हा रुग्णालयात रुग्ण व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना फळ वाटप केले. 

खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रम व काल्हेर येथील वृद्धाश्रमात भोजनदान तसेच अनगाव येथील अनाथाश्रमात भोजनदानही केले. यावेळी वंदनीय बाळासाहेबांच्या विचारांनी ऐंशी टक्के समाजकारण व वीस टक्के राजकारण हे तत्व पळत असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त हे सेवाभावी कामे हाती घेतल्याचं सांगितलं. यापुढेही हे समाजकार्य सुरूच राहतील अशी प्रतिक्रिया बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे भिवंडी लोकसभा संपर्कप्रमुख सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा यांनी दिली आहे.

Web Title: Financial fund for Goshalas on the occasion of Chief Minister's birthday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.