उद्योग अनुभव प्रतिष्ठानचा तिसरा वर्धापन दिन संपन्न
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2017 06:44 PM2017-11-19T18:44:40+5:302017-11-19T18:54:22+5:30
उद्योग अनुभव प्रतिष्ठानचा तिसरा वर्धापन दिन गडकरी रंगायतन येथे रविवारी सकाळी पार पडला.
ठाणे : उद्योग अनुभव प्रतिष्ठानचा तिसरा वर्धापन दिन गडकरी रंगायतन येथे रविवारी सकाळी पार पडला. यावेळी उद्योग भूषण प्रथम पुरस्कार राजेंद्र आळशी, द्वितीय पुरस्कार अनिल घुबे, तृतीय पुरस्कार मुकुंद राक्षे, उद्योग दीप्ति एन. आर.आय. पुरस्कार पूर्णिमा कामत, उद्योग दीप्ति प्रथम पुरस्कार शरयु देशमुख, द्वितीय पुरस्कार निवेदिता रानडे यांना गौरविण्यात आले.
यावेळी उद्योग अनुभव पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जागतिक चेंबर ऑफ कॉमर्सचे कार्याध्यक्ष खा. शिवाजीराव पाटील, विशेष अतिथी म्हणून सिंगापूरचे उद्योजक हर्षवर्धन भावे, प्रमुख पाहुणे म्हणून कॉटन किंगचे एम.डी. प्रदीप मराठे, बेडेकर मैनेजमेंट कॉलेजचे नितीन जोशी तसेच, पिताम्बरीचे रवींद्र प्रभुदेसाई, सुश्रेय प्रकाशनच्या श्वेता गानु व इतर उपस्थित होते.
यावेळी भावे यानी लघु उद्योजकाना मार्गदर्शन केले. तुमच्या पाल्याप्रमाणे तुमचा व्यवसाय संभाळा, व्यवसाय कधी थांबवू नका, तो पुढे चालूच ठेवा असा सल्ला त्यांनी दिला. खा. पाटील म्हणाले की, उद्योग हा शिकवून येत नसतो तर तो नैचरली किंवा मनात आले कि होतो, त्यासाठी कोणता कोर्स करावा लागतो असे मला तरी वाटत नाही, जे काही कराल त्यात उदयोग, उद्योजकशीलता असावी, उद्देश ठेवाल तर यशस्वी व्हाल असा सल्ला त्यांनी तरुणांना दिला. कोणताही व्यवसाय करा त्याशी प्रामाणिक रहा, बंधीलकी ठेवा असही त्यांनी सांगितले.
दरम्यान, पूर्वा कर्वे यानी उद्योग भूषण व उद्योग दीप्ति पुरस्काराने सन्मानित झालेल्या सत्कार मूर्तिंची मुलाखत घेतली. यावेळी उद्योग सुरु करताना आलेल्या अडचणी, त्यावर केलेली मात, मिळालेले मार्गदर्शन आणि यश हा प्रवास उलगडन्यात आला.
कार्यक्रमाचे निवेदन दिपाली केळकर यानी केले.