बँकेच्या 2 अधिकाऱ्यांकडूनच 17 लाखांचा अपहार, गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 10:51 PM2018-08-05T22:51:47+5:302018-08-05T22:52:52+5:30
शहरातील नवजीवन बँकेतील दोन अधिकाऱ्यांनी मुदत ठेव व आवर्ती ठेवीचे 17 लाख 4 हजार 266 रुपये बँकेत जमा न करता अपहार केला. याप्रकरणी
उल्हासनगर : शहरातील नवजीवन बँकेतील दोन अधिकाऱ्यांनी मुदत ठेव व आवर्ती ठेवीचे 17 लाख 4 हजार 266 रुपये बँकेत जमा न करता अपहार केला. याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उल्हासनगर येथे नवजीवन बँकेच्या अनेक शाखा असून कॅम्प नं-3 येथील बँक शाखेत कानयो घनयानी व श्रुती मोरे कनिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. 20 सप्टेंबर 2015 ते 13 जुलै 2018 च्या दरम्यान दोघांनीही मुदत व आवर्ती ठेवेची 17 लाख 4 हजार 266 रुपयांची रक्कम बँकेत जमा करण्याऐवजी अपहार करून बॅंक व ग्राहकांची फसवणूक केली. याप्रकरणी दोघांनाही बँकेने निलंबित केले असून बँक अधिकारी गिरीधर हरगुणांनी यांच्या तक्रारीवरून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यापूर्वीही बँकेतील अनेक प्रकरणात गुन्हे दाखल झाली आहेत.