आधारवाडी डम्पिंगवरील आग धुमसतीच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:40 AM2021-03-18T04:40:48+5:302021-03-18T04:40:48+5:30

कल्याण : पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील डम्पिंगला मंगळवारी रात्री ९.३०च्या सुमारास आग लागली. वाऱ्यामुळे पसरलेली आग बुधवारीही धुमसतच होती. अग्निशमन ...

The fire at Aadharwadi dumping is smoldering! | आधारवाडी डम्पिंगवरील आग धुमसतीच!

आधारवाडी डम्पिंगवरील आग धुमसतीच!

googlenewsNext

कल्याण : पश्चिमेतील आधारवाडी परिसरातील डम्पिंगला मंगळवारी रात्री ९.३०च्या सुमारास आग लागली. वाऱ्यामुळे पसरलेली आग बुधवारीही धुमसतच होती. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरूच असून, सहा अग्निशमन दलाच्या गाड्या आणि १२ पाण्याच्या टँकरच्या मदतीने हे काम सुरू असून दुर्गाडी खाडीलगतच्या डम्पिंगच्या बाजूस ही आग लागल्याने तसेच तेथे गाडीही जाऊ शकत नसल्याने आग विझविताना अग्निशमन कर्मचाऱ्यांची तारेवरची कसरत सुरू होती.

दरवर्षी उन्हाळ्याला प्रारंभ होताच आधारवाडी डम्पिंगला आग लागते. खाडीलगत हे डम्पिंग असून, मोठ्या प्रमाणावर वाहणाऱ्या वाऱ्यामुळे आगीचा धूर वाऱ्याच्या प्रवाहाबरोबरच सभोवतालच्या परिसरात पसरतो आणि तेथील रहिवाशांना श्वास गुदमरणे, खोकला येणे, मळमळणे आदी त्रासाला सामोरे जावे लागते. आगीचे प्रमाण अधिक असेल तर धुराचे लोट आधारवाडी परिसराबरोबरच वाडेघर, खडकपाडा, लालचौकी, शिवाजी चौक, गौरीपाडा, पौर्णिमा चौकीपर्यंत पसरतात. बुधवारी सकाळी आगीच्या धुराचे लोट ठाकुर्लीतील रेल्वे समांतर रस्ता आणि ९० फुटी रोडपर्यंतच्या परिसरापर्यंत पसरले होते.

मंगळवारी रात्री लागलेल्या आगीचे स्वरूप मोठे होते. सुमारे तीन ते चार एकर परिसरातील कचऱ्याला आग लागल्याने डम्पिंगला लागून असणारा सीएनजी पंप रात्रीपासून बंद ठेवण्यात आला आहे. बुधवारी आग नियंत्रणात आली होती. परंतु, धूर मोठ्या प्रमाणात होता. मात्र वाऱ्यामुळे पुन्हा ही आग भडकण्याची शक्यता असून आग पूर्णपणे विझविण्यासाठी उशीर लागू शकतो, असे अग्निशमन विभागाचे म्हणणे आहे.

------------

Web Title: The fire at Aadharwadi dumping is smoldering!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.