अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग पॉइंटला आग; इमारतीमधील दुकानात आग लागल्यानं धुराचे मोठे लोट

By पंकज पाटील | Published: April 24, 2023 06:11 PM2023-04-24T18:11:27+5:302023-04-24T18:11:44+5:30

अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जिंग पॉइंटला मोठी आग लागली.

Fire at electric bike charging point in Ambernath | अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग पॉइंटला आग; इमारतीमधील दुकानात आग लागल्यानं धुराचे मोठे लोट

अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक बाईक चार्जिंग पॉइंटला आग; इमारतीमधील दुकानात आग लागल्यानं धुराचे मोठे लोट

googlenewsNext

अंबरनाथ : अंबरनाथमध्ये इलेक्ट्रिक बाईकच्या चार्जिंग पॉइंटला मोठी आग लागली. शिवगंगा नगर परिसरात एका इमारतीच्या तळमजल्यावर असलेल्या दुकानात हे चार्जिंग पॉइंट होते. अंबरनाथ पूर्वेतील शिवगंगा नगरमध्ये हरी शिव अपार्टमेंट नावाची इमारत आहे. या इमारतीच्या तळमजल्यावरील एका दुकानात इलेक्ट्रिक बाइकचं चार्जिंग पॉइंट सुरू करण्यात आले होते.

 या ठिकाणी रविवारी दुपारच्या सुमारास पाच इलेक्ट्रिक बाईक चार्जिंगला लावलेल्या असताना अचानक शॉर्टसर्किटमुळे तिथे आग लागली. या आगीत पाचही इलेक्ट्रिक बाईक्सला आग लागल्यामुळे धुराचे मोठे लोट परिसरात उठले. आगीत पाचही बाईक संपूर्णपणे जळून खाक झाल्या असून दुकानाचंही मोठं नुकसान झाले आहे. या आगीची माहिती मिळताच अंबरनाथ अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत ही आग विझवली. या आगीत सुदैवाने कुणालाही इजा झालेली नाही.
 

Web Title: Fire at electric bike charging point in Ambernath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.