कोपरी परिसरात मीटर बॉक्स रुमला आग; चार मीटर जळून खाक, मोठा अनर्थ टळला

By अजित मांडके | Published: August 31, 2023 12:13 PM2023-08-31T12:13:47+5:302023-08-31T12:13:47+5:30

अग्निशमन दलाने ५ वा. ५० मिनिटांच्या सुमारास आग पूर्णपणे नियंत्रणात आणली

Fire at the meter box room in the Kopri area of Thane and Four meters were burnt, a major disaster was avoided | कोपरी परिसरात मीटर बॉक्स रुमला आग; चार मीटर जळून खाक, मोठा अनर्थ टळला

कोपरी परिसरात मीटर बॉक्स रुमला आग; चार मीटर जळून खाक, मोठा अनर्थ टळला

googlenewsNext

अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : कोपरी, अष्टविनायक चौक येथील तळ अधिक ३ मजली असलेल्या शुभ मंगल सोसायटी  या इमारतीच्या तळ मजल्यावरील महावितरण मीटर बॉक्स रुमला आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास समोर आली. ही आग २० मिनिटात नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले असून या आगीत ४ मीटर बॉक्स जळून खाक झाले आहेत.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी महावितरण विद्युत कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान यांनी धाव घेतली. मीटर बॉक्सला लागलेली आग अग्निशमन दलाच्या जवानांनी ०५:५० वाजताच्या सुमारास पूर्णपणे नियंत्रणात आणली अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन कक्षाने दिली.

Web Title: Fire at the meter box room in the Kopri area of Thane and Four meters were burnt, a major disaster was avoided

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.