शहर विकास विभागात लागली आग, स्फोटक फाईल्स भस्मसात करण्याचा आटापीटा, नारायण पवार यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2020 04:54 PM2020-06-16T16:54:16+5:302020-06-16T16:54:49+5:30

ठाणे महापालिकेच्या चवथ्या मजल्यावरील शहर विकास विभागात मंगळवारी शॉकसर्कीटमुळे आग लागल्याची घटना घडली आहे. मात्र आता यावरुन भाजपने मोठा आरोप केला आहे. स्फोटक फाईल्स भस्मसात करण्याासाठीच हा आटापीटा सुरु असल्याचा धक्कादायक आरोप भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी केला आहे.

Fire breaks out in city development department, Narayan Pawar accused of trying to burn explosive files | शहर विकास विभागात लागली आग, स्फोटक फाईल्स भस्मसात करण्याचा आटापीटा, नारायण पवार यांचा आरोप

शहर विकास विभागात लागली आग, स्फोटक फाईल्स भस्मसात करण्याचा आटापीटा, नारायण पवार यांचा आरोप

Next

ठाणे : ठाणे महापालिकेच्या चवथ्या मजल्यावरील शहर विकास विभागात मंगळवारी पहाटे आग लागल्याची घटना घडली. परंतु येथील सुरक्षा रक्षकांनी ही आग विझवली. शॉकसर्कीटमुळे ही आग लागली असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. परंतु स्फोटक फाईल्स भस्मसात करण्यासाठीच हा आटापिटा सुरू असल्याचा आरोप करीत भाजपचे नगरसेवक नारायण पवार यांनी सुमारे साडेपाच वर्षांच्या फाईल्स सीआयडीने ताब्यात घेण्याची मागणी केली आहे.
       शहर विकास विभागात मंगळवारी पहाटे शॉकसर्कीटने लागलेल्या आगीत काही एक संगणक व एलईडी टीव्ही जळून खाक झाला आहे. परंतु यात काही महत्वाच्या फाईल देखील जळाल्या असल्याची माहिती पालिका सुत्रांनी दिली आहे. या संदर्भात अद्याप पालिकेकडून काहीही जाहीर करण्यात आलेले नाही. यापूर्वी २६ फेब्रुवारी रोजी नगरसेवक नारायण पवार यांनी तत्कालीन आयुक्त संजीव जयस्वाल यांना पत्र पाठवून शहर विकास विभागाला आग लावण्याचा संशय व्यक्त केला होता. शहर विकास विभागाने काही वर्षांपासून हजारो इमारतींचे प्रस्ताव मंजूर केले. त्यानुसार वादग्रस्त बिल्डरांना सीसी, पार्ट ओसी, जोता प्रमाणपत्र, ओसी आणि टीडीआर देण्यात आल्याची अनेक कागदपत्रे आहेत. त्यातील काही संशयास्पद प्रस्तावांबाबत अनेक तक्र ारीही लाचलुचपत विभाग, मंत्रालय आणि सीआयडीकडे दाखल आहेत. त्याबाबत चौकशी सुरू आहे. तर काही व्यवहारांसंदर्भात उच्च न्यायालयाकडे जनहित याचिकाही (पीआयएल) दाखल करण्यात आल्या आहेत. या सर्व फाईल्सचा स्फोटक साठा सध्या शहर विकास विभागात आहे, याकडे नारायण पवार यांनी आयु्क्तांचे लक्ष वेधले होते. संभाव्य आगीपासून संरक्षण होण्यासाठी विभागातील इलेक्ट्रीक व्यवस्था, अग्निशमक उपकरणे आदींसह पर्यायी व्यवस्थेची तपासणी करण्याचीही विनंती नारायण पवार यांनी केली होती. मात्र, त्याची दखल घेण्यात आली नव्हती.
काल रात्री लागलेल्या छोट्या आगीने माझी भीती दुर्देवाने खरी ठरत आहे. संगणकाला आग लावल्यानंतर संपूर्ण शहर विकास विभाग खाक करण्याचा डाव फसला असावा, असा संशय व्यक्त करून नगरसेवक नारायण पवार यांनी तत्काळ सीआयडीने शहर विकास विभागातील गेल्या साडेपाच वर्षांच्या कालावधीतील सर्व फाईल्स ताब्यात घ्याव्यात, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे. या प्रकरणी वेळीच पावले न उचलल्यास, कोट्यवधींचा भ्रष्टाचार गडप केला जाईल, अशी भीतीही व्यक्त केली.

...त्या संगणकात नक्की
होते काय? - नारायण पवार
शहर विकास विभागातील आगीत काही संगणक जळाले आहेत. या संगणकात नक्की काय होते? त्याची सर्व्हरमध्ये नोंद झाली आहे का? याची चौकशी करण्याची गरज आहे. या विभागात एखाद्या विकास प्रस्तावाची (व्हीपी) संपूर्ण फाईल नक्की कधी सापडतच नाही, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे या आगप्रकरणाची सखोल चौकशी करावी, अशी मागणी नगरसेवक नारायण पवार यांनी आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे केली आहे.

 

Web Title: Fire breaks out in city development department, Narayan Pawar accused of trying to burn explosive files

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.