डोंबिवली एमआयडीसीतील गोदामाला आग; जीवितहानी नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2019 07:47 AM2019-07-04T07:47:47+5:302019-07-04T07:50:50+5:30
अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी; आग विझवण्याचे प्रयत्न सुरू
डोंबिवली: कपड्यासाठी लागणारं साहित्य पुरवणाऱ्या शारदा प्रोसेस कंपनीच्या चार मजली गोदामाला आग लागली आहे. सध्या घटनास्थळी केडीएमसीचे 7, उल्हासनगर, भिवंडी महापालिकेच्या अग्निशमन दलाचा प्रत्येकी एक आणि डोंबिवलीएमआयडीसीचा 1 बंब दाखल झाला आहे. गोदामाला लागलेली आग आटोक्यात येत नसल्याची माहिती केडीएमसीच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी सुरेश शिंदे यांनी दिली. एमआयडीसी फेज 2 मध्ये ही आग लागली असून त्यामध्ये अद्याप सुदैवानं कुठलीही जीवितहानी झालेली नाही.