मीरारोड मधील लेझर काम करणाऱ्या दुकानात आग लागल्याने रहिवासी भयभीत

By धीरज परब | Published: May 2, 2023 08:23 PM2023-05-02T20:23:07+5:302023-05-02T20:25:03+5:30

गेल्या वर्षा पासून तक्रार करून देखील पालिकेने घेतली नाही दखल 

fire broke out at a laser shop in mira road residents panicked | मीरारोड मधील लेझर काम करणाऱ्या दुकानात आग लागल्याने रहिवासी भयभीत

मीरारोड मधील लेझर काम करणाऱ्या दुकानात आग लागल्याने रहिवासी भयभीत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड - मीरारोडच्या एका निवासी इमारतीतील दुकानात मंगळवारी दुपारी मोठी आग लागल्याने रहिवासी भयभीत झाले . सदर दुकानात लेझर द्वारे घातक काम केलेलं जात असल्याची तक्रार गेल्या वर्षा पासून महापालिकेस करून देखील कारवाई न झाल्या बद्दल रहिवाश्यांनी संताप व्यक्त केला . 

मीरारोडच्या बेव्हर्लीपार्क भागात पालिका पाण्याच्या टाकी समोरच मुकुंद रितू नावाची इमारत आहे . सदर इमारतीच्या एका दुकानात लेझर द्वारे एक्रेलिक आदींवर डिझाईन बनवण्याचे काम केले जात असल्याने त्याचा खूपच त्रास होत असल्याची तक्रार रहिवाश्यांनी गेल्या वर्षी महापालिकेत केली होती . 

दरम्यान मंगळवारी दुपारी सदर दुकानात भीषण आग लागली . आग इतकी भडकलेली होती कि धुराचे लोट उंच उसळले . लोकं घाबरून घरातून बाहेर पाडली . कनकिया व भाईंदर येथील पालिका अग्निशमन केंद्रातील वाहनांनी येऊन आग आटोक्यात आणली . मात्र आतील सर्व जाळून खाक झाले. छताच्या पंख्याची पाती सुद्धा आगीने वाकडे झाली .  

या घटनेने रहिवाशी संतप्त झाले आहेत . सदर लेझर द्वारे चालणारे काम बंद करावे यासाठी रहिवाश्यांनी सह्या करून महापालिकेस तक्रार केली होती . उपायुक्त रवी पवार यांना भेटून तक्रार सांगितली. मात्र महापालिकेने कारवाई न केल्याने आजची दुर्घटना घडली व रहिवाश्यांच्या जीवावर बेतल्याचा आरोप रहिवासी प्रीती पाठक यांनी केला आहे . या बाबत पोलिसात तक्रार करणार असल्याचे त्या म्हणाल्या . 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

Web Title: fire broke out at a laser shop in mira road residents panicked

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.