मोठी बातमी! पालघरमध्ये फटाका कारखान्याला भीषण आग, १५ किमीपर्यंत बसले धक्के
By ऑनलाइन लोकमत | Published: June 17, 2021 12:39 PM2021-06-17T12:39:08+5:302021-06-17T12:39:48+5:30
डहाणू तालुक्यातील वाणगाव येथील फटाका निर्मिती कारख्याला गुरुवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास भीषण आग लागली आहे.
डहाणू तालुक्यातील डेहने पले येथील फटाका कंपनीत आज सकाळी आग लागून भीषण स्फोट झाल्याची घटना घडली. स्फोटानंतर आगीने रौद्ररूप धारण केल्याने ज्वाळा २० ते २५ किमी वरूनही दिसत होत्या. डहाणू, तारापूर एमआयडीसी येथून अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचं काम सुरू आहे.
पालघर : डहाणूमध्ये फटाका कंपनीत भीषण स्फोट, 5 ते 10 किमी परिसर हादरलाhttps://t.co/CbvSFUjpi9pic.twitter.com/jphV7hzVox
— Lokmat (@MiLOKMAT) June 17, 2021
डहाणू तालुक्यातील डेहणे येथील विशाल फटाका कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. डहाणू चारोटी मुख्य हायवेपासून १५ किमी अंतरावर जंगल सदृश्य भागात ही कंपनी आहे. अचानक झालेल्या स्फोटाने आजूबाजूचा १५ते २० किलोमीटर अंतरावरील घरांना मोठे धक्के जाणवले आहेत. त्यामुळे हे धक्के भूकंपाचे असल्याचे सोशल मीडियावरून प्रसारित होत असताना काही वेळाने हे धक्के फटाक्याच्या आगीच्या स्फोटाचे असल्याचे कळले. नेमका हा स्फोट कशामुळे झाला आहे, याची माहिती अद्याप कळू शकली नाही. या घटनेत पोलीस सूत्रांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार चार ते ते पाच लोक गंभीर जखमी झाले असल्याची माहिती मिळत आहे.