भिवंडीत अग्नितांडाव सुरूच, बुधवारी आमने येथील दोन कंपन्या खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:39 AM2021-03-25T04:39:09+5:302021-03-25T04:39:09+5:30

भिवंडी : भिवंडीत आगीचे सत्र सुरूच असून, मंगळवारी भंगाराच्या सात गोदामांना लागलेली आग विझते न विझते तोच आमने ...

Fire continues in Bhiwandi, two companies in Amne Khak on Wednesday | भिवंडीत अग्नितांडाव सुरूच, बुधवारी आमने येथील दोन कंपन्या खाक

भिवंडीत अग्नितांडाव सुरूच, बुधवारी आमने येथील दोन कंपन्या खाक

Next

भिवंडी : भिवंडीत आगीचे सत्र सुरूच असून, मंगळवारी भंगाराच्या सात गोदामांना लागलेली आग विझते न विझते तोच आमने गावात असलेल्या गोदाम संकुलनातील दोन कंपन्यांना बुधवारी पहाटेच्या सुमारास भीषण आग लागल्याची घटना घडली. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल झाले असून, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

आमने गावच्या हद्दीत असलेल्या महावीर गोदाम संकुलनात व्हीआरआयपीएल रिटेल कंपनी व ऑर्बिट एक्स्पोर्ट कंपनी या दोन गोदाम कंपन्यांना पहाटे भीषण आग लागली. दोन्ही कंपन्या जळून खाक झाल्या आहेत. या गोदाम कंपन्यांमध्ये प्लास्टिक, कॉस्मेटिक, घरगुती साहित्य, हार्डवेअर तसेच कापडाचा मोठ्या प्रमाणात साठा होता. या आगीचे नेमके कारण अजून समजू शकले नाही. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी भिवंडी, कल्याण, ठाणे येथील तीन गाड्या दाखल झाल्या असून, आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

मार्च महिना आला की, भिवंडीत गोदाम व यंत्रमाग तसेच डाईंग सायजिंग कंपन्यांना आग लागण्याचे सत्र सुरू होत असल्याने या आगींमागील नेमके कारण समजत नाही. त्यामुळे या आगी अचानक लागतात की, इन्शुरन्स मिळविण्यासाठी लावल्या जातात, याबाबतचे सत्य समोर येताना दिसत नाही. त्यामुळे या घटनांची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत.

===Photopath===

240321\img-20210324-wa0006.jpg

===Caption===

भिवंडीत अग्नितांडाव सुरूच ; आमने येथील दोन कंपन्यांना भीषण आग , घटनास्थळी अग्निशमन यंत्रणा दाखल

Web Title: Fire continues in Bhiwandi, two companies in Amne Khak on Wednesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.