मिथेन वायू बाहेर पडण्यास वाव नसल्याने आग विझविण्यात येत आहेत अडचणी, तरीसुध्दा ९० टक्के आग आटोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2018 03:46 PM2018-03-10T15:46:17+5:302018-03-10T15:46:17+5:30

दिवा डम्पींगला लागलेल्या आगीवर चवथ्या दिवशी नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले आहे. परंतु मिथेन वायू बाहेर पडण्यास वाव नसल्याने ही आग पुन्हा पेट घेण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

Fire is extinguished due to lack of methane gas, 90 percent of fire extinguishes | मिथेन वायू बाहेर पडण्यास वाव नसल्याने आग विझविण्यात येत आहेत अडचणी, तरीसुध्दा ९० टक्के आग आटोक्यात

मिथेन वायू बाहेर पडण्यास वाव नसल्याने आग विझविण्यात येत आहेत अडचणी, तरीसुध्दा ९० टक्के आग आटोक्यात

Next
ठळक मुद्देडम्पींगवर २५ फुटापर्यंत खोल पाईप टाकण्याच्या सुचनाएक वॉटर टँकर सतत उपलब्ध राहणार

ठाणे - दिव्यातील डम्पींगला बुधवारी मध्यरात्री २ च्या सुमारास लागलेली आग चवथ्या दिवशी देखील काही अंशी धगधगत आहे. ही आग ९० टक्के विझविण्यात आली असून मिथेन वायू बाहेर पडण्यास जास्तीचा वाव नसल्याने ही आग पुन्हा पुन्हा वाढत असल्याचा दावा ठाणे महापालिकेच्या अग्निशमन विभागाने केला आहे. त्यामुळे यावर उपाय करण्याचे देखील प्रयत्न सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
                दिव्यातील डम्पींगवर रोज ८०० मेट्रीक टन टाकला जात आहे. त्यामुळे मागील कित्येक वर्षापासून टाकण्यात येत असलेल्या या कचºयाचे एकावर एक असे ढिग तयार झाले आहेत. त्यामुळे या कचऱ्याच्या खाली मिथेन वायू तयार होत असतो. त्याला कडक उन्हामुळे तो पेट घेतो आणि यातूनच ही आग वारंवार लागत असल्याचे पालिकेच्या अग्निशमन विभागाचे म्हणने आहे. वरच्यावर आग विझविली जात असली तर कचऱ्याच्या शेवटपर्यंत पाणी जात नसल्याने दिवसभर आग विझविल्यानंतरही रात्री ही आग पुन्हा पेट घेत आहे. परंतु असे असले तरी चवथ्या दिवसापर्यंत या आगीवर ९० टक्के नियंत्रण मिळविण्यात आले असल्याचे अग्निशमन विभागाचे प्रमुख शशिकांत काळे यांनी स्पष्ट केले आहे. ही आग आटोक्यात राहण्यासाठी अग्निशमनच्या चार टिम या भागात तैनात करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
       एकाच ठिकाणी तीन ते चार वर्षे कचरा टाकला गेल्यानंतर वीस ते पंचवीस फूटांचे कचरयाचे ढीग तयार होतात. या कचरयाखाली कायम मिथेन वायू तयार होत असतो. पावसाळा अथवा हिवाळयात या मिथेन वायूचा त्रास सहसा होत नाही. परंतु उन्हाळ्यात तापमान वाढल्यानंतर हा मिथेन वायू पेट घएत असल्याने डम्पींगवर आग लागत असते. अशावेळी मिथेन वायूला थेट वातावरणात जाण्यासाठी जागा मिळावी यासाठी या डम्पींगवर खोलवर मोठे पाईप टाकण्याची सूचना करण्यात आल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. जेणे या २० ते २५ फूटाच्या पाईपमधून तयार झालेला मिथेन थेट वातावरणात जाऊ शकेल. तसेच या परिसरात कायम एक पाण्याचा टँकर उपलब्ध करु न देण्याची सूचना करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.


 

Web Title: Fire is extinguished due to lack of methane gas, 90 percent of fire extinguishes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.