रुग्णालयांत अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नाही, भिवंडीतील चित्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2018 02:45 AM2018-12-22T02:45:10+5:302018-12-22T02:45:20+5:30

अंधेरीतील कामगार रुग्णालयास लागलेल्या आगीमुळे शहराच्या रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेबरोबर रुग्णांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. याबाबत, अग्निशमन दलाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू झालेली नाही.

 Fire-fighting machinery is not available in the hospital; | रुग्णालयांत अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नाही, भिवंडीतील चित्र

रुग्णालयांत अग्निशमन यंत्रणाच उपलब्ध नाही, भिवंडीतील चित्र

Next

भिवंडी : अंधेरीतील कामगार रुग्णालयास लागलेल्या आगीमुळे शहराच्या रुग्णालयातील अग्निरोधक यंत्रणेबरोबर रुग्णांच्या सुरक्षेचा विषय ऐरणीवर आला आहे. याबाबत, अग्निशमन दलाकडून कोणत्याही प्रकारची हालचाल सुरू झालेली नाही.
सरकारचे इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय आहे. त्याचप्रमाणे शहरात ११० खाजगी रुग्णालये आहेत. नवीन १० रुग्णालयांची कामे शहर व परिसरात सुरू आहेत. शहरातील अनेक रुग्णालयांच्या इमारती बेकायदा आहेत. त्याचप्रमाणे या इमारती रुग्णालयासाठी न बांधल्याने तेथील सदनिका घेऊन त्यामध्ये रुग्णालये सुरू केलेली आहेत. त्यामुळे काही इमारतींचे जिने व पायऱ्या लहान आहेत. अनेकवेळा या जिन्यांवरून स्ट्रेचर नेताना अडचणीचे ठरते. याचा रुग्णांना त्रास सहन करावा लागतो. रुग्णालय सुरू करण्यासाठी घेतलेल्या जागेत नंतर प्रयोगशाळा, मेडिकल स्टोअर, विविध मशीन लावून अडचणी निर्माण केल्या जातात. अशा स्थितीत दुर्घटना घडल्यास रुग्णांना, त्यांच्या नातेवाइकांना व डॉक्टरसह कर्मचाºयांना एकाचवेळी बाहेर पडणे कठीण होणार असल्याने याबाबत नियमावलीनुसार रुग्णालयात सुविधा असणे गरजेचे आहे. रुग्णालयात आगप्रतिबंधक साधने आणि साहित्य उपलब्ध नसते.
याबाबत पालिकेचे वैद्यकीय अधिकारी व अग्निशमन दलाच्या अधिकाºयांकडून आतापर्यंत कोणत्याही रुग्णालयांवर कारवाई झालेली नाही. रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अग्निशमन दलाने फायर आॅडिट करण्याची सक्ती केली पाहिजे. दुर्दैवाने रुग्णालयाला आग लागल्यास जिन्याव्यतिरिक्त रुग्णालयाबाहेर जाण्यासाठी मार्ग नसेल, तर अनर्थ होईल.
आरोग्य सेवा संचालनालयाने रुग्णालयाची नोंदणी करताना किंवा पुनर्नोंदणी करताना अग्निशमन दलाचे नाहरकत दाखला प्रमाणपत्र सक्तीचे केले असले, तरी नर्सिंग होम अ‍ॅक्टमध्ये एनओसी अथवा वापरबदलाचा उल्लेख नाही. त्यामुळे अनेक रुग्णालयांच्या संचालक व मालकांनी अग्निप्रतिबंधक साधनांकडे दुर्लक्ष केलेले आहे. पालिकेच्या या कारभारावर भिवंडीतील नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे.

शहरातील खाजगी रुग्णालये व इंदिरा गांधी स्मृती रुग्णालयाचे फायर आॅडिट करून घेणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी पालिकेकडून रुग्णालयांना नोटिसा दिल्या जाणार आहे. तसेच फायर अधिकाºयांनी रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी रुग्णालयांची पाहणी करून त्याचा अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. -मनोहर हिरे,आयुक्त

अंबरनाथ पालिकेतील अग्निशमन यंत्रणा कुचकामी


अंबरनाथ : अंबरनाथ पालिकेच्या वतीने शहरातील इमारती आणि नागरी वस्तींना आगीपासून संरक्षित करण्यासाठी सक्षम यंत्रणा असल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ज्या पालिकेवर संपूर्ण शहराची जबाबदारी आहे, त्याच पालिकेच्या कार्यालयाची अग्निशमन यंत्रणाच कुचकामी ठरत आहे. पालिका कार्यालयात जी अग्निशमन यंत्रणा बसवण्यात आली आहे, त्यातील अनेक आग नियंत्रित करणारे बाटले हे कालबाह्य झाले आहेत. त्यांची मुदत संपलेली असतानाही पालिका कार्यालयात हे बाटले तसेच शोभेसाठी लावून ठेवण्यात आले आहेत.
अंबरनाथ शहरात अग्निशमन यंत्रणा किती कुचकामी आहे, याचे मूर्तिमंत उदाहरण अंबरनाथ पालिकेत दिसते. ज्या पालिकेत अग्निशमनविरोधी यंत्रणाच कार्यान्वित नाही, त्या कार्यालयात अग्निशमन विभागाने आग विझवणारे बाटले बसवले आहे. त्या बाटल्यांची मुदत संपलेली असतानाही पालिकेने त्या बाटल्यांना नव्याने रिफिलिंग केले नाही. मुदतीपूर्वीच त्यांचे रिफिलिंग करणे गरजेचे आहे. अंबरनाथ पालिकेतील सर्व यंत्रणाही कालबाह्य झाल्या आहेत. अंबरनाथ पालिकेचे फायर आॅडिट नियमित करणे गरजेचे आहे. अग्निशमन विभागातील कर्मचारी आणि अधिकाºयांना आपत्कालीन परिस्थितीतच महत्त्वाची जबाबदारी सांभाळावी लागते. मात्र, अन्य वेळेस कर्मचारी आणि अधिकाºयांनी पालिकेच्या इमारतीच्या सुरक्षेकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, अग्निशमन विभागाचे अधिकारीच पालिकेच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करत आहे.

Web Title:  Fire-fighting machinery is not available in the hospital;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.