लेक सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर आग; अडकलेल्या एकाचा जीव वाचला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 09:04 PM2020-02-15T21:04:38+5:302020-02-15T21:12:07+5:30
या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने क्युरे रुग्णालयात दाखल करण्यात आले.
ठाणे - शहरातील लेक सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर मोठी आग लागली. ही घटना कापूरबावडी परिसरातील घडली असून आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. मोठ्या प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात आली आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशमन दलाच्या दोन गाड्या रवाना झाल्या असून आग विजवण्याचे काम करण्यात आले होते. दुपारी १. ४० वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. आगीनंतर प्रचंड धूर झाला होता. दरम्यान एक व्यक्ती अडकली होती. या व्यक्तीला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने क्युरे रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra: Fire breaks out on the first floor of Lake City Mall, Kapurbawdi near Balkum Fire Station in Thane (West). Fire-fighting operation underway. No casualty or injury reported till now. pic.twitter.com/C1CkfIKq4H
— ANI (@ANI) February 15, 2020
या घटनेत अद्याप कोणालाही दुखापत नाही. परंतु सदर घटनेत चौथ्या मजल्यावर नामदेव झोरे ही व्यक्ती अडकली होती. त्या व्यक्तीस श्वास घेण्यास त्रास होत असल्याने क्युरे रूग्णालय येथे दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच पाचपाखाडी अग्निशमन केंद्राचे तांडेल आणि रविंद्र शेलार (५०) यांनाही गुदामरल्या सारखे झाल्याने त्यांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे.
ठाणे - कापूरबावडी येथे लेक सिटी मॉलच्या पहिल्या मजल्याला लागली आग. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल https://t.co/CbvSFUjpi9
— Lokmat (@MiLOKMAT) February 15, 2020
मॉलमधील वरच्या मजल्यावर अडकलेल्या एकाला सुरक्षित बाहेर काढण्यास अग्निशमन दलाला यश आले. सिटी मॉलच्या पहिल्या मजल्यावर दुपारच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीच्या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा कुणीही जखमी झाला नाही, अशी माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली.