ठाणे उपवनच्या जंगलातील आग आटोक्यात आणल्याने अनर्थ टळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 06:32 PM2020-01-13T18:32:37+5:302020-01-13T18:38:18+5:30
उपवन तलावाच्या चौबाजूला येऊरचे जंगल असून त्यास लागून संजय गांधी राष्टÑीय उद्यान आहे. या जंगालातील वणवा वेळीच विझवण्यात यश मिळाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या जंगालस लागलेली आग ही परिसरात फिरणा-या व्यक्तींच्या निष्काळीपणातून लागल्याचा संशय आहे. या वणव्याच्या धुरांचे लोट या तलावाजवळी गावंड इमारतीमधील रहिवाश्याच्या नजरेत आले. त्याने त्वरीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास दूरध्वनी करून या वनव्याची माहिती दिली
ठाणे : उपवन तलावाजवळील जंगलास सायंकाळीअचानक आग लागली. या वणव्यात परिसरातील गवत मोठ्याप्रमाणात जळले. वन अधिकाऱ्यांनी वेळीच दक्षता घेऊन या आगीला आटोक्यात आणल्यामुळे रात्रभर जंगल जळून होणार अनर्थ वनविभागाच्या सतर्कतेने टळला.
उपवन तलावाच्या चौबाजूला येऊरचे जंगल असून त्यास लागून संजय गांधी राष्टÑीय उद्यान आहे. या जंगालातील वणवा वेळीच विझवण्यात यश मिळाल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या जंगालस लागलेली आग ही परिसरात फिरणा-या व्यक्तींच्या निष्काळीपणातून लागल्याचा संशय आहे. या वणव्याच्या धुरांचे लोट या तलावाजवळी गावंड इमारतीमधील रहिवाश्याच्या नजरेत आले. त्याने त्वरीत महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षास दूरध्वनी करून या वनव्याची माहिती दिली. त्यास अनुसरून अग्निशमनदलाची गाडी या उपवन तलावाजवळ गेली. पण आग आतमध्ये जंगलात असल्यामुळे घटनास्थळी गाडी जाणे शक्य झाले नाही.
या अग्निशमन दलाच्या जवानांनी येऊरच्या वन अधिकाऱ्यांच्या निदर्शनात ही घटना आणून देण्यात आली. यानुसार वन अधिकारी, कर्मचाºयांनी या वनव्याच्या ठिकाणी जावून झाडांच्या फांद्याव्दारे लागलेली आग विझवण्यात यश मिळवल्याचे येऊर वनअधिकारी राजेंद्र पवार यांनी लोकमतला सांगितले. वनअधिकारी व कर्मचाºयांची नजर चुकवून या जंगलात शिरणाºयांकडून ही आग लागल्याचा आंदाज आहे.संजय गांधी राष्टÑीय उद्यानास लागून असलेल्या या येऊरच्या जंगलातील माननिर्मित हालचालींवर वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा या जंगलातील वनवा राष्टÑीय उद्यानात शिरून पशूपक्षी, वन्यप्राणी आणि वनसंपत्ती, औषधी वनस्पती जळून नष्ठ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
............